Sam Curran in most expensive IPL auction 2023 tweet viral  
क्रीडा

Sam Karan: चेन्नईमधून पंजाबमध्ये जाताच सॅम करनचे ट्विट व्हायरल...

Kiran Mahanavar

IPL Most Expensive Player Sam Karan : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावात इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करनला पंजाब किंग्जने तब्बल 18.50 कोटी रुपयांना सामील करून घेतले आहे. करनला दुखापतीमुळे लीगच्या शेवटच्या हंगामात मुकावे लागले होते, मात्र या हंगामात तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. करनला विकत घेण्यासाठी त्याच्या दोन जुन्या संघ पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये दीर्घ लढाई झाली, ज्यामध्ये पंजाबने बाजी मारली. यासह करन हा या लीगमध्ये सर्वाधिक विकला जाणारा खेळाडूही ठरला आहे. चेन्नईमधून पंजाबमध्ये जाताच सॅम करनचे ट्विट व्हायरल झाले आहे.

आयपीएलमध्ये 32 सामने खेळणाऱ्या सॅम करनने 23 डावांमध्ये 22.47 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये करनच्या नावावर दोन अर्धशतके आहेत, तर गोलंदाजीत त्याने 31 डावात 31.09 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या आहेत. लीगमधील पहिल्या सत्रात पंजाब किंग्जकडून खेळताना करनने हॅट्ट्रिक घेतली. 20 वर्षे आणि 302 दिवसांच्या वयात हॅट्ट्रिक घेणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे. पंजाबमध्ये सामील झाल्यानंतर सॅम करनने ट्विट करत लिहिले की, जिथून सुरुवात झाली तेथेच जात आहे.

आतापर्यंत झालेल्या लिलावात इंग्लिश खेळाडूंना खूप फायदा झाला आहे. करन हा लीगमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला, तर हॅरी ब्रूकने पहिल्या सत्रातच धडाकेबाज खेळ केला. या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्रूकने लिलावात अनेक संघांमध्ये बोलीचे युद्ध रंगले आणि त्यानंतर तो सनरायझर्स हैदराबादपर्यंत पोहोचला. राजस्थान रॉयल्सशी निकराची झुंज जिंकल्यानंतर हैदराबादने ब्रूकला 13.25 कोटींमध्ये करारबद्ध केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT