commonwealth games
commonwealth games 
क्रीडा

CWG 2022 : 'हे' खेळाडू भारताला मिळवून देऊ शकतात सुवर्ण पदक

ऋषिकेश साळवी

कॉमनवेल्थ गेम्स 2022 शुक्रवार 29 जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू होणार आहेत. या खेळांमध्ये 72 देशांतील 5 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत असून, यामध्ये 20 खेळांमध्ये 280 स्पर्धा होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत भारत नेहमीच प्रबळ दावेदार राहिला आहे. यात 110 पुरुष आणि 103 महिला खेळाडू आहेत.

जेव्हा आपण भारतातील महिला बॅडमिंटन खेळाडूबद्दल बोलतो, तेव्हा पॉप अप होणारी पहिली दोन नावे सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारतातील पहिली आणि एकमेव महिला, सिंधूने 2022 मध्ये सिंगापूर ओपन आणि स्विस ओपनचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
"हजार मैलांचा प्रवास एका पायरीने सुरु होतो" या म्हणीचे चानू हे उत्तम उदाहरण...मणिपूरची मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले. चानूने ग्लासगो येथे रौप्य आणि गोल्ड कोस्टमध्ये सुवर्णपदक जिंकणारी दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्स पदक विजेती आहे. चानू 30 जुलै रोजी महिलांच्या 55 किलो गटात स्पर्धा करेल आणि या खेळांमध्ये अभूतपूर्व तिसरे CWG पदक मिळवण्याचा प्रयत्न करेल.
मनिका बत्रा ही भारतीय टेबल टेनिसच्या स्टार्सपैकी एक आहे. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत मनिका बत्राने तीन सुवर्णपदके जिंकली होती आणि रिओ 2016 ऑलिम्पिक मध्ये पदार्पण केले ,टोकियो 2020 मध्ये ऑलिम्पिकमध्ये 32 व्या फेरीत पोहोचणारी मनिका बत्रा ही भारतातील पहिली महिला टेबल टेनिस खेळाडू ठरली.
बजरंग पुनिया हा हरियाणाचा राहणारा भारतीय फ्री स्टाईल कुस्तीपटू आहे. तो सध्या ६५ किलो वजनी गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत तीन पदके जिंकणारा तो एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर त्याने आपल्या यादीत ऑलिम्पिक पदक जोडले.
विनेश फोगट कुस्तीपटूंच्या एका यशस्वी कुटुंबातून आल्या आहेत, 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने तिचे पहिले वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल (कांस्य) जिंकले. आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावले, Matteo Pellicone Ranking Series 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या डायना मेरी हेलन वेकरचा 4-0 असा पराभव केला.
20 वर्षांचा, लक्ष्य सेन बॅडमिंटनमध्ये भारतासाठी सुपरस्टार आहे. भारताने 14 वेळा थॉमस चषक विजेत्या इंडोनेशियाला हरवून जेतेपदावर कब्जा केला. लक्ष्य 3 ऑगस्ट रोजी CWG 2022 मध्ये त्याच्या मोहिमेला सुरुवात करेल. बॅडमिंटनमध्ये भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा त्याच्या तरुण खांद्यावर अवलंबून असतील.
पुढची 'मेरी कोम' म्हणून ओळखली जाणारी निकत जरीन CWG 2022 मध्ये टर्की येथे नुकत्याच झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी जरीन हिचा बॉक्सिंगमध्ये केवळ पाच भारतीय महिलांनी विश्वविजेतेपद पटकावले आहे त्या यादीमधे समावेश.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT