PV Sindhu Sakal
क्रीडा

PV Sindhu : विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सिंधू सज्ज; मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

पी. व्ही. सिंधू हिने उबेर करंडक व थायलंड ओपन या दोन स्पर्धांमधून माघार घेतली. तसेच मागील सहा स्पर्धांमध्ये तिच्याकडून प्रभावी कामगिरीही झालेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

क्वालालम्पूर : गुडघ्याच्या दुखापतीमधून बरी होत बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या पी. व्ही. सिंधू हिला मागील सहा स्पर्धांमध्ये प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. याप्रसंगी पॅरिस ऑलिंपिकआधी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारताची फुलराणी सज्ज झाली असेल. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून (ता. २१) सुरू होणार आहे. महिला एकेरीत सिंधूच्या खेळाकडे तमाम बॅडमिंटनप्रेमींच्या नजरा खिळलेल्या असणार आहेत.

पी. व्ही. सिंधू हिने उबेर करंडक व थायलंड ओपन या दोन स्पर्धांमधून माघार घेतली. तसेच मागील सहा स्पर्धांमध्ये तिच्याकडून प्रभावी कामगिरीही झालेली नाही. दोन स्पर्धांमध्ये तिला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली.

सिंधूने शेवटचे जेतेपद २०२२मध्ये मिळवले. सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर तिला अजिंक्यपदापासून दूरच राहावे लागले आहे. मागील वर्षी झालेल्या स्पेन मास्टर्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात तिला यश मिळाले होते; पण त्या वेळी तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दिग्गज खेळाडूंची अनुपस्थिती

ॲन सी यंग, चेन यु फेई, अकाने यामागुची व कॅरोलिना मरीन या दिग्गज महिला बॅडमिंटनपटूंची अनुपस्थिती असल्यामुळे पी. व्ही. सिंधूला मलेशिया मास्टर्स स्पर्धेत फॉर्मात येण्याची संधी असणार आहे. युवा खेळाडूंविरुद्ध खेळून ती आपला फॉर्म कमवू शकणार आहे.

प्रकाश पडुकोण यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ती सराव करीत आहे. तिच्यासह महिला एकेरीमध्ये अश्‍मिता छलीहा, आकर्षी कश्‍यप, मालविका बन्सोड या खेळाडूंकडूनही भारतीय संघाला आशा असणार आहेत. या सर्व खेळाडू बराच काळ आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या खेळामध्ये सुधारणा अपेक्षित आहे.

किरण जॉर्ज लढणार

पुरुषांच्या एकेरीत भारताचे प्रमुख खेळाडू सहभागी होणार नाही. त्यामुळे किरण जॉर्जच्या खेळावर मदार असणार आहे. तसेच दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी ही स्टार जोडीही सहभागी होणार नाही. त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे कृष्णा प्रसाद - साई प्रतीक, बी. सुमीत रेड्डी - एन. सिक्की रेड्डी, सतीशकुमार - आदया वारियाथ यांना दुहेरीत दमदार कामगिरी करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT