PV Sindhun sakal
क्रीडा

CWG 2022: पी व्ही सिंधूने रचला इतिहास; भारताची 19 व्या सुवर्णपदकाला गवसणी

सिंधू या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिली असून तिने हा सामना जिंकून सुवर्णपदकला गवसणी घातली आहे.

Kiran Mahanavar

PV Sindhun Commonwealth Games 2022 : बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूने इतिहास रचला आहे. भारताने 19 व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. बॅडमिंटनमधील महिला एकेरीचा अंतिम सामन्यात भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना कॅनडाच्या मिशेल लीशी झाला. पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या लढतीत कॅनडाच्या मिशेल लीचा 21-15, 21-13 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

सिंधूने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. पीव्ही सिंधूने पहिला गेम 21-15 अशा फरकाने जिंकत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. दुखापतीनंतरही सिंधू चांगली कामगिरी करत होती. दुसऱ्या गेममध्ये पीव्ही सिंधूनं मिशेल लीला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही आणि त्याने 21-13 कॅनडाच्या मिशेल लीशी पराभव केला. यासह भारताने न्यूझीलंडला मागे टाकत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे.

पीव्ही सिंधूला राष्ट्रकुल 2022 मधील सुवर्णपदक सामना जिंकण्यासाठी फक्त 48 मिनिटे लागली. कॅनडाची शटलर मिशेल लीविरुद्ध पीव्ही सिंधूचा हा 9 वा विजय आहे. मिशेल लीने यापूर्वी गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकेरी आणि सांघिक स्पर्धांमध्ये पीव्ही सिंधूचा दोनदा पराभव केला होता. पीव्ही सिंधूने बर्मिंगहॅममध्ये मोठ्या अभिमानाने गोल्ड कोस्टमधील त्या दोन पराभवांचा बदला घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT