Quinton de Kock  esakal
क्रीडा

Quinton de Kock : निवृत्तीच्या घोषणेनंतर डिकॉकचा डबल धमाका; चोकर्सचा शिक्का पुसण्यासाठी कसली कंबर

अनिरुद्ध संकपाळ

Quinton de Kock : भारतात होत असलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दमदार सुरूवात केली. आपल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेविरूद्ध 428 धावा ठोकून त्यांनी धमाका केला होता. आता दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध देखील दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉकने तर दोन्ही सामन्यात शतकी धमाका केला. क्विंटन डिकॉकने वर्ल्डकपनंतर निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे तो आपल्या शेवटच्या वर्ल्डकपमध्ये आफ्रिकेचा चोकर्सचा शिक्का पुसण्यासाठी कंबर कसली आहे.

क्विंटन डिकॉक यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरूद्ध त्याने 84 चेंडूत 100 धावा ठोकल्या. त्यानंतर वर्ल्डकपमधील आपला दुसरा सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने 106 चेंडूत 109 धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाविरूद्ध मोठी धावसंख्या उभारू शकला. क्विंटन डिकॉकने आपल्या या धडाकेबाज खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार मारले.

विशेष म्हणजे क्विंटन डिकॉक हा 2015 आणि 2019 चा वर्ल्डकप देखील खेळला होता. मात्र त्यात त्याला एकही शतक झळकावता आले नाही. 2015 मध्ये त्याने 8 डावात फलंदाजी केली. तर 2019 मध्ये त्याने 9 डावात फलंदाजी केली होती. मात्र आता 2023 च्या वर्ल्डकपमध्ये त्याने पहिल्या दोन डावात दोन शतकी खेळी केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT