Quinton De Kock sakal
क्रीडा

Video : ना नो-बॉल, ना वाइड, तरीही आफ्रिकेने फुकट दिल्या 5 धावा, काय सांगतो नियम?

क्विंटन डी कॉकच्या 'त्या' चुकीमुळे आफ्रिकेला 5 धावांचा दंड बसला.

Kiran Mahanavar

Quinton De Kock Video : क्रिकेट हा खेळ जितका साधा वाटतो तितकेच त्याचे नियमही गुंतागुंतीचे आहेत. डझनभर वेगवेगळ्या नियमांनी खेळल्या जाता हा गेम कधी कधी खेळाडूंनाही चकित करतो. असाच काहीसा प्रकार टी-20 विश्वचषकात पाहायला मिळत आहे. भारत-पाकिस्तान सामन्यातील शेवटच्या षटकात फ्री-हिटवर मिळालेल्या 'बाय'च्या नियमावरून झालेल्या गोंधळानंतर दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे सामन्यात अशाच नियमानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

होबार्टमध्ये सुपर-12 फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे हे दोन संघ भिडले. मात्र पावसामुळे सामना 20-20 षटकांवरून 9-9 षटकांचा करण्यात आला. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 9 षटकात 79 धावा केल्या. मात्र, यात त्याला फुकटात 5 धावा मिळाल्या. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकची नकळत झालेली चूक कारण ठरली.

मिल्टन शुम्बाने शेवटच्या षटकात एनरिक नॉर्खियाच्या तिसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्कूप खेळला. चेंडू बॅटला लागून फाइन लेगला गेला. तिथे फिल्डरने चेंडू अडवून यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककडे फेकला. तिथेच क्विंटन डी कॉकने आपल्या पायाने अडला, चेंडू थांबवण्यापूर्वी, डी कॉकने एक ग्लोव्ह्ज काढला आणि चेंडू पायावर आदळला. त्या मैदानावर पडलेल्या ग्लोव्ह्जवर जाऊन लागला.

नियम काय म्हणतो?

अंपायरने पेनल्टी रनचे संकेत देताच नोरखियाला धक्का बसला, पण नंतर त्याला कारण समजावून सांगण्यात आले. आता हा काय नियम आहे? नियम 28.2.1 नुसार, कोणत्याही खेळाडूने जाणूनबुजून चेंडू रोखणे बेकायदेशीर मानले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

RCB संघ मुंबईवरील विजयानंतरही तिसऱ्या क्रमांकावरच; प्रत्येक संघाच्या ४ सामन्यांनंतर कशी आहे Points Table ची स्थिती

SCROLL FOR NEXT