R Ashwin 
क्रीडा

R Ashwin : 'सर तुम्ही...' चांद्रयानचे लॅंडींग अन् मोदींच्या नावाने अश्विनला आली कमेन्ट

Kiran Mahanavar

R Ashwin : बुधवार 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीपणे पार पडली. अखेर, अनेक वर्षांच्या अपयशानंतर भारताचे नाव आणि ध्वज चंद्रावर पोहोचला. इस्रोने 14 जुलै रोजी चंद्रासाठी प्रक्षेपित केलेले मिशन चांद्रयान-3 चे लँडर विक्रम बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. यासह भारत चंद्रावर पोहोचणारा जगातील चौथा देश ठरला.

देशाच्या या यशावर सर्वांनी आनंद व्यक्त केला. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनही मागे राहिला नाही, पण यादरम्यान त्याला पीएम नरेंद्र मोदींच्या नावाच्या ट्विटर हँडलवरून रिप्लाय आला का प्रकरण आहे ते जाणून घेऊ.

भारताच्या तिसर्‍या चंद्र मोहिमेच्या चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. संपूर्ण देश टीव्ही, मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे टक लावून पाहत होता. इस्रोने विक्रम लँडरच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगची घोषणा करताच सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला.

या यशाबद्दल क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. अश्विनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, या ऐतिहासिक कामगिरीबद्दल इस्रोचे अभिनंदन जय हिंद!.

अश्विनच्या ट्विटमध्ये दूसर काही वेगळे असे नव्हते, परंतु या ट्विटवर आलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अश्विनच्या या ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ट्विटर हँडलवरून उत्तर आले. प्रत्येक भारतीयाचे अभिनंदन. हे शक्य केल्याबद्दल इस्रोचे आभार.

आता एखाद्याच्या ट्विटवर भारताच्या पंतप्रधानांनी उत्तर दिले तर त्याच्याकडे लक्ष जाणे स्वाभाविक आहे, पण इथे फक्त एकच फरक होता. हे ट्विटर हँडल पीएम मोदींचे नसून त्यांच्या नावाने बनवलेले पैरोडी खाते होते. त्यात पीएम मोदींच्या मूळ हँडलसारखेच प्रोफाइल चित्र होते, परंतु त्याच्या पुढे नाव (पैरोडी) लिहिलेले होते. यासोबतच त्यावर निळ्या रंगाची टिकही होती.

अश्विननेही ही संधी सोडली नाही आणि मजा करत या कमेंटवर उत्तर दिले आणि लिहिले की, सर कसे आहात? तुम्ही माझ्या ट्विटला उत्तर दिल्यामुळे मला खूप आनंद झाला. मला हा सन्मान वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT