R Ashwin shares picture with Virat kohli clears the air about their fight  
क्रीडा

INDvsWI : कोहली-अश्विनमध्ये भांडण? बघा हा फोटो

वृत्तसंस्था

अॅंटिग्वा : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यात सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. या सर्व चर्चांना सुरवात झाली जेव्हा वेळोवेळी कोहलीने अश्विनच्याऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान द्यायला सुरवात केली. मात्र, अश्विनने या सर्व चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 318 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातही कोहलीने अश्विनच्या जागी कुलदीपला संघात स्थान देणे पसंत केले. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने कोहलीला बडबड केली. मात्र, या सामन्यानंतर अश्विन आणि कोहली एकत्र वेळ घालविताना दिसले आहेत. 

अश्विनने स्वत: त्याच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अश्विन आणि कोहलीसोबत लोकेश राहुल, मयांक अगरवाल आणि कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही दिसत आहे. विंडीजमधील एका जहाजात त्यांनी सामन्यानंतर सुटीचा आनंद घेतला. 

यंदाच्या आयपीएलच्या मोसमातही कोहली आण अश्विन यांच्यात खुन्नस पाहायला मिळाली होती. रॉयल चॅंलेजर्स बंगळूर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात कोहलीने अश्विनचा झेल घेतल्यावर त्याने रागाने ग्लोव्ह्ज फेकून दिले होते. त्याच सामन्यात कोहलीला बाद केल्यावर अश्विनने खूप हातवारे करत आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे या दोघांमध्ये सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु होत्या.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT