R Ashwin Tussle With The Umpire And James Anderson sakal
क्रीडा

Ind vs Eng : अश्विन हे करतोय तरी काय... आधी अंपायर नंतर अँडरसनशी भिडला...! जाणून घ्या प्रकरण

Kiran Mahanavar

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात रविचंद्रन अश्विन मैदानावर किरकोळ वाद घालताना दिसला. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी अश्विन फलंदाजीला आला. त्याने एकूण 10 चेंडूंचा सामना करत पाच धावा केल्या. यानंतर पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली.

विशाखापट्टणम कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटच्या मैदानावर भारतीय फिरकीपटू आर अश्विन चर्चेत आला. मैदानावर विरोधी खेळाडूंशी भांडण केल्यामुळे अनेकदा चर्चेत असलेला अश्विन यावेळी पंचांशी वाद घालताना दिसला.

तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विन जेम्स अँडरसनसोबत भिडला. अश्विनच्या काही बोलण्याचा अँडरसनला राग आला. त्यानंतर त्यांच्यात कायतरी बाचाबाची झाली. मात्र, नंतर अँडरसनने अश्विनला झेलबाद केले. अश्विन 20 धावा करून बाद झाला.

मात्र, यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. जैस्वाल व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. 34 धावा करणारा शुभमन गिल हा संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT