R. Praggnanandhaa vs Magnus Carlsen News sakal
क्रीडा

R. Praggnanandhaa : आर. प्रज्ञानंदचा 'क्लास‍िक चेस'मध्ये इतिहास! नंबर 1 खेळाडू मॅग्नस कार्लसनचा प्रथमच केला पराभव

R. Praggnanandhaa vs Magnus Carlsen News : भारताच्या रमेशबाबू प्रज्ञानंदने 'क्लास‍िक चेस'मध्ये मॅग्नस कार्लसनचा प्रथमच पराभव केला आहे.

Kiran Mahanavar

R. Praggnanandhaa vs Magnus Carlsen : भारताच्या रमेशबाबू प्रज्ञानंदने 'क्लास‍िक चेस'मध्ये मॅग्नस कार्लसनचा प्रथमच पराभव केला आहे. भारताच्या या युवा खेळाडूने नॉर्वे चेस 2024 च्या तिसऱ्या फेरीत जगातील नंबर 1 खेळाडूचा पराभव केला. या विजयासह 18 वर्षीय भारतीय खेळाडू रमेशबाबू प्रज्ञानंदने कार्लसनच्या घरच्या मैदानावर झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आघाडीचे स्थान प्राप्त केले आहे.

18 वर्षीय ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंदने बुधवारी (29 मे) स्टॅव्हेंगर येथे नॉर्वे चेस 2024 स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनवर पहिला विजय नोंदवला. आर प्रज्ञानंदने नॉर्वे चेस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या शेवटी 9 पैकी 5.5 गुण मिळवले. दुसरीकडे, अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियो कारुआनाने बुधवारी जीएम डिंग लिरेनवर विजय मिळवून तीन गुण मिळवून दुसरे स्थान मिळवले.

प्रज्ञानंदसाठी ही मोठी उपलब्धी आहे, गेल्या वर्षीच्या विश्वचषकात तो मॅग्नस कार्लसनकडून पराभूत झाला होता. योगायोगाने, 'क्लास‍िक चेस'मध्ये कार्लसनला पराभूत करणारा प्रज्ञानंद हा केवळ चौथा भारतीय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT