Virat Kohli Rohit Sharma Controversy  esakal
क्रीडा

Virat Kohli Rohit Sharma Controversy : विराट - रोहित वाद! शास्त्रींनी रूममध्ये बोलवलं अन्... माजी प्रशिक्षकाचा मोठा गौप्यस्फोट

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Rohit Sharma Controversy : भारतीय पुरूष वरिष्ठ संघात गेल्या काही वर्षात अनेक वादळे उठली होती. भारतीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन ग्रुप असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. भारताने 2019 चा वर्ल्डकप हरल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद आहेत.

त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले असल्याचेही वृत्त आले होते. त्यावेळचे संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या सगळ्या अफवा आहेत असे म्हणत वादाचा विषय उडवून लावला होता.

मात्र आता भारताचे माजी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद होता यावर अप्रत्यक्षरित्या शिक्कामोर्तबच केलं आहे. त्यांनी आपल्या 'Coaching Beyond' या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

विराट - रोहित वादाबाबत श्रीधर आपल्या पुस्तकात लिहितीत की, '2019 चा वर्ल्डकप झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकत होते. संघात रोहितचा वेगळा आणि विराट कोहलीचा वेगळा गट आहे असे बोलले जात होते.'

'या दोघांपैकी एकाने दुसऱ्याला सोशल मीडियावर अनफॉलो केले होते. अशा प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर वाद आणि फूट वाढण्याची शक्यता असते.'

श्रीधर पुढे म्हणतात की, 'आम्ही वर्ल्डकपनंतर 10 दिवासांनी अमेरिकेत वेस्ट इंडीजविरूद्ध टी 20 मालिका खेळण्यासाठी दाखल झालो. दाखल झाल्या झाल्या रवी शास्त्रींनी पहिले काम केले ते म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्माला त्यांच्या रूममध्ये बोलवलं. त्यांना भारतीय क्रिकेटमधलं वातावरण हे खेळीमेळीचं असलं पाहिजे हे समजावून सांगितलं.'

'त्यामुळे तुम्हा दोघांमध्ये वाद असू नयेत. सोशल मीडियावर जे काही झालं ते ठिक आहे मात्र तुम्ही दोघं अनुभवी क्रिकेटपटू आहात. हे त्वरित थांबलं पाहिजे. रवी शास्त्रींनी खास आपल्या शैलीत या दोघांना समजावलं.'

रवी शास्त्रींनी समजावल्यानंतर कोहली - रोहितने विषय बाजूला ठेवला असं श्रीधर सांगतात. 'तुम्हाला आढळून आले असेल की त्यानंतर संघातील गोष्टी सुरळीत होऊ लागल्या. रवी शास्त्रींनी प्रकरण अत्यंत काळजीपूर्वक हाताळलं. त्यांनी दोन्ही खेळाडूंना एकत्र आणलं. त्यांना एकत्र बसवून बोलायला लावलं. रवी शास्त्रींना कोणताही वेळ न दडवडता हे केलं. रवी शास्त्रींमुळे संघ सगळ्यापेक्षा मोठा आहे हे अधोरेखित झालं.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT