क्रीडा

Rachin Ravindra : नजर लागू नये माझ्या नातवाला! वर्ल्ड कप गाजवणाऱ्या रचिनची आज्जीने काढली दृष्ट

अनिरुद्ध संकपाळ

Rachin Ravindra Grand Parent :

न्यूझीलंडने वर्ल्डकप 2023 मधील आपल्या लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा 5 विकेट्स राखून पराभव केला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडने सेमी फानयलचे तिकीट जवळपास निश्चित केले आहे. न्यूझीलंडच्या भारतीय वंशाच्या रचिन रविंद्रने दोन विकेट्स आणि 42 धावा करत अष्टपैलू कामगिरी केली. या कामगिरीनंतर रचिन आणि त्याच्या आजीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

रचिनने यंदाच्या वर्लडकपमध्ये तीन शतकी खेळी केल्या आहेत. हा त्याचा पदार्पणाचाच वर्ल्डकप असून तो यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 565 धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

आपल्या नातवाच्या या भरीव कामगिरीला दृष्ट लागू नये म्हणून रचिनच्या आजीने त्याची घरात आल्यावर दृष्ट काढली. सध्या सोशल मीडियावर हाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी आजीची माया न्यारीच असते.

प्रथम फंलादाजी करणाऱ्या श्रीलंकेला किवींनी 171 धावात गुंडाळले. रचिन रविंद्रने 7.4 षटकात 21 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. बोल्टने 3 विकेट्स घेत लंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. न्यूझीलंडने श्रीलंकेचे 172 धावांचे माफक आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 23.2 षटकातच पार केले. न्यूझीलंडकडून सलामीवीर रचिन रविंद्रने 34 चेंडूत 42 धावा करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

रचिन रविंद्र सध्या 565 धावा करत यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्या खालोखाल दक्षिण अफ्रिकेचा क्विंटन डिकॉक 550 धावा करून दुसऱ्या तर विराट कोहली 543 धावा करत तिसऱ्या स्थानावर आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, अनेक भागांत २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

Fifa World Cup 2026 : घानाचा 'घाला'! तगड्या इंग्लंडला रडवले; २८ वर्ष, दुसरा सामना अन् परंपरा कायम, L गटात खतरनाक चुरस

Success Story: सामान्य कुटुंबातून असामान्य यश! यशवंत जगतापांची प्रेरणादायी कामगिरी; सरकारी भरती परीक्षांत यशाचा धडाका

SCROLL FOR NEXT