Radhika Avati of Sangli wins gold in National Fencing; Selection for Olympic Qualifying Round
Radhika Avati of Sangli wins gold in National Fencing; Selection for Olympic Qualifying Round 
क्रीडा

सांगलीच्या राधिका आवटीला राष्ट्रीय तलवारबाजीत सुवर्णपदक; ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी निवड

घनशाम नवाथे

सांगली : तलवारबाजी स्पर्धेतील मर्दानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीच्या राधिका आवटी हिने नुकतेच रुद्रपूर (उत्तराखंड) येथे झालेल्या 31 व्या वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत फॉईल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. कतार (दोहा) येथे होणाऱ्या फॉईल ग्रॅंड प्रीक्‍स स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तसेच ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी तिची निवड झाली आहे. 


राधिकाचे मूळ गाव अकिवाट (ता. शिरोळ) येथील आहे. तिचे प्राथमिक शिक्षण कुपवाडमधील नवकृष्णा व्हॅली येथे झाले आहे. सध्या ती केरळ येथे "साई' प्रशिक्षण केंद्रात सराव करते. गतवर्षी वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. तिची ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी निवड झाली होती. कोविड-19 च्या संकटामुळे गतवर्षी ऑलिंपिक पात्रता फेरी होऊ शकली नाही. 


यंदा 31 वी वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धा नुकतेच रुद्रपूर (उत्तराखंड) येथे झाली. केरळ संघाकडून खेळताना राधिकाने फॉईल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. तर सांघिक प्रकारात संघाला रौप्य पदक मिळवून दिले. या स्पर्धेतील कामगिरीमुळे कतार (दोहा) येथे 26 ते 28 मार्चअखेर होणाऱ्या फॉईल प्रकारातील ग्रॅंड प्रीक्‍स स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तसेच यंदाही ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी तिची निवड झाली आहे.

मुळचे हरिपूर (ता. मिरज) येथील आणि सध्या केरळमधील साई केंद्रात कार्यरत एनआयएस प्रशिक्षक सागर लागू यांच्या मार्गदर्शनाखाली राधिका सराव करते. फॉईल प्रकारात सध्या ती देशातील "टॉप' ची खेळाडू आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धातून तिने अनेक पदकांची लयलूट केली आहे. एशियन गेम्स आणि ऑलिंपिक 2024 साठी तिचा सराव सुरू आहे. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT