Radhika Sharma wins silver medal in taekwondo at Khelo India Games Sakal
क्रीडा

Khelo India : ‘खेलो इंडिया’त तायक्वांदोमध्ये राधिका शर्माला रौप्यपदक

खेलो इंडिया राष्ट्रीय महिला लीग तायक्वांदो स्पर्धेत राधिका शर्मा हिने रौप्य पदकाची कमाई केली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : खेलो इंडिया राष्ट्रीय महिला लीग तायक्वांदो स्पर्धेत राधिका शर्मा हिने रौप्य पदकाची कमाई केली. ओरिसा कटक येथील जे एन इंडोर स्टेडिअम येथे ९ ते ११ मार्च दरम्यान झालेल्या खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत केरला, पश्चिम बंगाल, दिल्ली तसेच अरुणाचल प्रदेश या खेळाडूंना पराभूत करत स्पर्धेत रौप्य पदक पटकावले.

यापूर्वी राधिकाने २७ फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान पॉंडिचेरी येथे झालेल्या खेलो इंडिया महिला लीग राष्ट्रीय पूर्व तायक्वांदो स्पर्धेच्या तिसऱ्या फेजमध्ये राधिका शर्मा, श्रेया पराडकर यांनी आपापल्या वजन गटात रौप्यपदके पटकावीत अंतिम फेजमध्ये आपले स्थान पक्के केले होते.

या स्पर्धेत श्रेया पराडकर हिने उत्कृष्ट केळी केली परंतु मणिपूर सोबतच्या अतीतटीच्या सामन्यात तीला हार पत्करावी लागली. संघासोबत संघ प्रशिक्षक म्हणून अंतरा हिरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील एक्सलंट तायक्वादो ॲकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या या खेळाडूंना राष्ट्रीय पदकविजेते लता कलवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

WPL 2026 All Team Players: दीप्ती शर्मा महागडी खेळाडू, तर मुंबई इंडियन्सनेही केरसाठी मोजले ३ कोटी; पाहा लिलावानंतरचे सर्व संघ

SCROLL FOR NEXT