rafaelnadal
rafaelnadal  sakal
क्रीडा

राफेल नदाल French Openच्या अंतिम फेरीत

सकाळ ऑनलाईन टीम

french open final: क्ले कोर्टवरील ‘लाल बादशहा’ म्हणून ओळखला जाणाऱ्या राफेल नदालने अॅलेक्झँडर झ्वेरेवविरुद्ध ७-६ (८), ६-६ असा विजय मिळवला आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. झ्वेरेवने दुसऱ्या सेटमध्ये दुखापतीमुळे सामना सोडला आणि नदालचा मार्ग मोकळा झाला.

उपांत्य फेरीत अव्वल मानांकित नोवाक जोकोविचला शह देणाऱ्या नदालने आजच्या उपांत्य सामन्यातही तेवढेच वर्चस्व राखले. हा सामना दोन सेटचा झाला असला तरी काही गेम अफलातून झाले. दुसरा सेटही टायब्रेकरवर जात होता. सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाली, पण याचवेळी झ्वेरेवचा गुडघा दुखावला. त्याला चालणेही कठीण झाले. अखेर कुबड्या घेऊन तो कोर्टबाहेर गेला.

पहिल्या सेटच्या पहिल्याच गेमध्ये नदालची सर्व्हिस झ्वेरेवने भेदली तेव्हा धक्कादायक निकाल लागणार असे अनेकांना वाटू लागले होते, पण सर्वाधिक ‘ग्रँड स्लॅम’ जिंकणाऱ्या आणि क्ले कोर्टवरही सर्वाधिक विजयाचा विक्रम करणाऱ्या नदालने सहजपणे पुनरागमन केले. त्याचे काही रिटर्न केवळ अफलातून होते.

दहाव्या गेमध्ये नदालने झ्वेरेवची सर्व्हिस भेदली आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. याच वेळी झ्वेरेवने केलेल्या दुहेरी चुका त्याच्या खेळावर पाणी फेरणाऱ्या ठरल्या. झ्वेरेव वेगात चेंडू मारण्याचा प्रयत्नात नेटमध्ये किंवा लॉबीत चेंडू मारत होता, या संधीचा नदालने फायदा घेतला. यासह नदाल १४ व्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. अंतिम सामन्यात त्याच्यासमोर आता कॅस्पर रूड आणि मारिन सिलिक यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.

नदालची खिलाडू वृत्ती

ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून विक्रमी २१ वेळा ‘ग्रँड स्लॅम’ जेतेपद जिंकणे व आपल्या कारकीर्दीत एकूण चौदाव्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठणे हा नदालसाठी अभिमानाचा क्षण असला तरी त्याने तो साजरा केला नाही. दुखापत झालेल्या झ्वेरेवला सांभाळण्यासाठी तो कोर्टच्या बाजूला लगेच धावला. झ्वेरेवला आलिंगन देऊन त्याने त्याला कुबड्यांसह कोर्टबाहेर जाण्यासाठी आधारही दिला, त्यामुळे त्याच्या या खिलाडूवृत्तीने सर्वांची मने जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singapore Airlines: लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद; निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक प्रथमच 52,000च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहचा पाय खोलात! कोर्टानं ७ विविध कलमांतर्गत केली आरोप निश्चिती

Blackout Teaser Out: "वक्त बदलने वाला है!"; '12 वी फेल' फेम विक्रांतच्या 'ब्लॅकआऊट'चा जबरदस्त टीझर रिलीज

HSC Result : पत्रकार व्हायचंय? 12वी नंतर काय कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT