Rafael Nadal sakal
क्रीडा

Rafael Nadal : राफेल नदालची दुखापतीमुळे माघार ; लाल मातीच्या कोर्टवरील सराव लांबणीवर

स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल याने दुखापतीमुळे माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोनॅको : स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल याने दुखापतीमुळे माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. नदालने सर्वाधिक १४ वेळा फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅमचे अजिंक्यपद पटकावले असून यंदा या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

राफेल नदाल याने माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नदालचा लाल मातीच्या कोर्टवरील सराव लांबणीवर पडला आहे. ३७ वर्षीय नदालला मागील वर्षी दुखापत झाली.

या वर्षी तो फक्त तीन व्यावसायिक लढती खेळला. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅममधूनही त्याने माघार घेतली. नदालने टेनिस स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर म्हटले की, सध्या माझे शरीर टेनिस कोर्टवर उतरून लढत खेळण्यासाठी साथ देत नाही. त्यामुळे विश्रांती करणे पसंत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT