Rahi Sarnobat
Rahi Sarnobat Sakal
क्रीडा

Shooting champion : मराठमोळ्या राहीच्या खात्यात आणखी एक सुवर्ण!

सुशांत जाधव

दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत राही सरनोबत (Rahi Sarnobat ) हिने सुवर्ण वेध साधलाय. 25 मीटर पिस्तूल प्रकारात तिने ही कामगिरी करुन दाखवलीये. महिला गटातील 25 मीटर पिस्तूल प्रकारात राहीनं 37 (581) सुवर्ण पदकाची कमाई केली. या क्रीडा प्रकारात नामिया कपूर (Naamya Kapoor) हिला 31 (578) रौप्य तर मनू भाकरला Manu Bhaker 30(4) कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 2008 मध्ये पुणे येथे पार पडलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत राहीने आपल्यातील क्षमता सिद्ध करत सुवर्ण कामगिरी करुन दाखवली होती. त्यानंतर तिने एका मागून एक स्पर्धा गाजवण्याचा धडाका सुरु केला.

2007 पासून आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 हून अधिक पदकांची कमाई करणाऱ्या राहीने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा प्रतिनिधित्व केले होते. 2019 मध्ये म्युनिच येथे पार पडलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीने राहीने ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांकडून मोठ्या आशा होत्या. यात राही सरनोबतचाही समावेश होता. या स्पर्धेत राहीसह दिग्गज नेमबाजांच्या पदरी निराशा पडली. यातून सावरत राहिने पुन्हा एकदा नव्या जोमाने खेळाला सुरुवात केल्याचे दिसते.

राहिची कामगिरी लक्षवेधीच....!

2010 मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही राहीला सुवर्ण पदक मिळाले होते. 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने विशेष ठसा उमटवला. दक्षिण कोरियात झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राहीने सुवर्ण वेधी कामगिरी करुन दाखवली होती. 2014 मध्ये स्कॉसलंडमधील ग्लासगोमध्ये राहीने याच क्रीडा प्रकारात सुवर्ण कामगिरी केली होती. 2018 मध्ये इंडोनेशियातील जकार्तामध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत राहीने सुवर्ण पदकाला गवसणी घातल्याचे पाहायला मिळाले होते. ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत (2021) सांघिक क्रीडा प्रकारात राही सरनोबतला सुवर्ण पदक मिळाले आहे. याच वर्षी क्रोएशियातील ओसिजेकमध्येही तिने सुवर्ण वेध साधला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT