Rahul Dravid File Photo
क्रीडा

आधारस्तंभाची नवी इनिंग; द्रविड टीम इंडियाचा कोच

श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाला मार्गदर्शन केल्यापासूनच द्रविड कोच होणार हे पक्के झाले होते.

सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांची टीम इंडियाच्या कोचपदी नियुक्ती झाली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने एकमताने द्रविडच्या नावाला सहमती दर्शवली. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेणार आहे. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रवि शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यानंतर द्रविड या पदावर विराजमान होईल. श्रीलंका दौऱ्यावर तात्पुरत्या स्वरुपात कोच म्हणून गेल्यापासूनच द्रविड कोच होणार हे पक्के झाले होते. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी द्रविडला मुख्य कोचपदी काम करण्यासाठी तयार केले आहे.

न्यूझीलंड दौऱ्यापासूनच द्रविड भारतीय संघाला जॉईन होईल. सध्याच्या घडाला रवि शास्त्री टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आहेत. शास्त्रींच्या कारकिर्दीत टीम इंडियाने दमदार कामगिरी केली असली तरी वर्ल्ड कप स्पर्धेत संघाची कामगिरी सुमार राहिली आहे. युएईच्या मैदानात रंगलेली स्पर्धा शास्त्रींसाठी अखेरची आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी खराब राहिली आहे.

एका बाजूला अफगाणिस्तानसोबत सामना सुरु असताना द्रविड यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याची बातमी आली. 26 आक्टोबर रोजीच बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते. राहुल द्रविड यांनी इंडिया अ आणि अंडर 19 टीमच्या प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळली आहे. याशिवाय ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखही आहेत. द्रविडच्या मार्गदर्शनाखालीच पृथ्वी शॉ, शुभमन गिल यासरखे युवा क्रिकेटर घडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ लॉजवर मैत्रिणीसह अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

मोठी बातमी! वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान दुखापत; प्रॅक्टिस अर्धवट सोडून बाहेर पडला, श्रीलंका ए विरुद्धचा सामना खेळणार का?

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

SCROLL FOR NEXT