World Cup Final 2023 Rahul Dravid sakal
क्रीडा

World cup 2023: ...अन् तोही एका कोपऱ्यात रडत होता... कोच राहूल द्रविड आता तुटलेल्या मनाने घेणार निरोप

Kiran Mahanavar

World Cup Final 2023 Rahul Dravid : वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या विजेतेपदाचा सामना सहा गडी राखून जिंकून त्याने विजेतेपद पटकावले.

यादरम्यान रोहित शर्मा भावूक झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रोहितचा व्हिडिओ सर्वांनीच पाहिला आहे, मात्र याच व्हिडिओमध्ये राहुल द्रविडचा काही सेकंदांचा व्हिडिओही आहे, जो पाहून प्रत्येक भारतीयाला वाईट वाटेल.

टीम इंडियाच्या मिस्टर डिपेंडेबलपासून ते NCA आणि त्यानंतर प्रशिक्षकपदापर्यंत राहुल द्रविडने सर्वत्र आपले 100 टक्के दिले. मात्र, द्रविडला ज्या यशाचा तो नेहमीच हकदार होता त्याची चव चाखता आली नाही आणि आता पुन्हा एकदा त्याची निराशा झाली आहे.

राहुल द्रविड नोव्हेंबर 2021 मध्ये टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला. द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाला उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले आणि संघाने देश-विदेशात चांगली कामगिरी केली. द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने तीन मोठ्या टूर्नामेंटच्या बाद फेरी गाठली, पण विजेतेपदाच्या अगदी जवळ येऊनही भारतीय संघ चॅम्पियन बनू शकला नाही.

2023 च्या वर्ल्ड कपमधील पराभवानंतर राहुल द्रविडला आता तुटलेल्या मनाने निरोप द्यावा लागणार आहे. खरं तर राहुल द्रविडचा करार दोन वर्षांसाठी होता. वर्ल्ड कपनंतर त्यांचा कार्यकाळ संपला आहे. अशा स्थितीत बीसीसीआय आता नव्या प्रशिक्षकाच्या शोधत आहे.

मात्र, द्रविडच्या नावावर फेरविचार केला जाऊ शकतो आणि तो प्रशिक्षकपदासाठीही आपले नाव पुढे करू शकतो. पण याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

2021 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर रवी शास्त्रींच्या जागी राहुल द्रविडकडे प्रशिक्षकाची जबाबदारी आली. द्रविडच्या कोचिंगमध्ये भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली होती, पण टीम इंडियाचा येथेही ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला.

द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाला आशिया कपमध्ये मोठे यश मिळाले. आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले. मायदेशात टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होईल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar चा खरंच साखरपुडा झाला आहे का? चाहत्याच्या प्रश्नावर सचिन तेंडुलकरने काय दिलं उत्तर? वाचा

Mumbai News: पावसात बेघरांची दैना! मोसमी निवाऱ्यांची कमतरता, उघड्यावर राहणाऱ्यांचे हाल सुरूच

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Pune Ward Structure : महापालिकेकडे आत्तापर्यंत प्रभाग रचनेवर १६१ हरकती

Latest Marathi News Updates: फडणवीसांनी शिंदेंना काम करु दिलं नाही- जरांगे

SCROLL FOR NEXT