IND vs NZ ICC World Cup 2023  ESAKAL
क्रीडा

Rahul Dravid IND vs NZ : किवींसाठी यह दीवार टूटती क्यों नहीं! आधी 2003 आता 2023 द्रविड अपराजितच

अनिरुद्ध संकपाळ

IND vs NZ ICC World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 मध्ये भारतीय संघाने आपला सलग पाचवा सामना जिंकून सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढं टाकलं आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंड नावाचं कोडं सोडवलं असून भारताने किवींचे 274 धावांचे आव्हान 6 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं.

विशेष म्हणजे भारतीय संघाने तब्बल 20 वर्षांनी न्यूझीलंडचा आयसीसी स्पर्धेत पराभव केला. यापूर्वी 2003 च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड भारताकडून पराभूत झाली होती. त्यानंतर भारताला एकदाही न्यूझीलंडला आयसीसी स्पर्धेत पराभूत करता आलं नव्हतं.

2003 च्या आणि 2023 च्या न्यूझीलंडविरूद्धच्या विजयात भारताचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची महत्वाची भुमिका होती. 2003 च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात राहुल द्रविडने दमदार अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक गमावली होती. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा डाव 146 धावात संपुष्टात आला होता.

यानंतर मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला होता. राहुल द्रविडने 7 चौकारांसह 53 धावा केल्या होत्या. तर मोहम्मद कैफने देखील 68 धावांची शानदार खेळी केली होती.

मात्र या विजयानंतर भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरूद्ध यश मिळाले नाही. आता 20 वर्षानंतर धरमशाला येथे भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं. या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. त्यामुळे दोन्ही विजयात द्रविड यांचा खास वाटा आहे.

भारताने न्यूझीलंडचा पराभव करत वर्ल्डकप 2023 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पाच पैकी पाच सामने जिंकणाऱ्या भारताचे आता 10 गुण झाले आहेत. भारताचे राऊंड रॉबिनमधील अजून चार सामने शिल्लक आहेत. भारतीय संघ इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँडसोबतचे सामने बाकी आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT