Rahul Dravid Team India 
क्रीडा

Rahul Dravid : "हनिमून पिरियड संपला" राहुल द्रविडवर टीम इंडियाच्या माजी विकेटकिपरची टीका

भारतीय क्रिकेट संघाला यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. मात्र याआधी राहुल द्रविड नेतृत्वाखाली भारतीय संघासाठी आशिया कप मध्ये काही चांगली कामगिरी करता आली नाही.

Kiran Mahanavar

Rahul Dravid Team India : भारतीय क्रिकेट संघाला यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. मात्र याआधी आशिया कप मध्ये भारतीय संघासाठी काही चांगली राहिली नाही. सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर पडली. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्यानंतर आशिया कप ही त्यांच्या प्रशिक्षक कार्यकाळातील पहिली मोठी स्पर्धा होती. यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला काही चांगली कामगिरी करता आली नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या माजी विकेटकिपर खेळाडू सबा करीमने द्रविडवर टीका केली आहे.

साबा करीम एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, राहुल द्रविडसाठी आता कोठे कठीण काळ सुरू झाला आहे. राहुल द्रविडला देखील माहित आहे की आता त्यांचा हनिमून पिरियड संपला आहे. तो परिपूर्ण संघ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आतापर्यंत तो असं करताना दिसला नाही.

साबा करिबने आपल्या वक्तव्यात राहुल द्रविड आपली कोचिंग कारकीर्द कशी यशस्वी करू शकतो हे देखील सांगितले. राहुल हा अतिशय हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आहे. त्याला माहीत आहे की जर त्याला आपले कोचिंग यशस्वी करायचे असेल तर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध कसोटी मालिका जिंकणे हा एक पर्याय आहे. मी फक्त कसोटी जिंकण्याबद्दल बोलत नाही. राहुल द्रविड जेव्हा खेळाडू म्हणून खेळायचा तेव्हाही हे घडायचे. पण जर भारतीय संघाने या देशांमध्ये कसोटी मालिका जिंकली तर कुठेतरी राहुल द्रविड संघाच्या कामगिरीवर खूप खूश असेल.

ऑस्ट्रेलिया संघाला आता भारत दौऱ्यावर यायचे आहे. येथे 20 सप्टेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघही भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन दिवसांच्या अंतरानंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिका खेळायची आहे. यानंतर भारतीय संघाला ५ दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. यामध्ये टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT