Rahul Dravid to mentor Lucknow Super Giants sakal
क्रीडा

Rahul Dravid : टीम इंडियाला बाय बाय...! गंभीरच्या भूमिकेत दिसणार राहुल द्रविड, आली मोठी ऑफर?

Kiran Mahanavar

Rahul Dravid to mentor Lucknow Super Giants : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 नंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागी भारतीय संघात कोच म्हणून कोण काम पाहणार हे अद्याप ठरलेले नाही.

दरम्यान मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, राहुल द्रविड इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुनरागमन करू शकतात. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सशी चर्चा करत आहेत. जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर द्रविड आयपीएल 2024 पूर्वी एलएसजीचा मार्गदर्शक बनू शकतो.

द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही, परंतु द्विपक्षीय सामन्यांमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम नंबर 1 रँकिंग आहेत. त्यांनी वर्ल्ड कपमध्ये सलग 10 सामने जिंकले पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम फेरीत त्यांना अंतिम अडथळा पार करता आला नाही.

बीसीसीआय भविष्यातील रणनीती जाणून घेण्यासाठी द्रविडसोबत बैठक घेऊ शकते. परंतु द्रविड मुदतवाढ मागेल अशी शक्यता कमी आहे. त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. जो संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि सततच्या प्रवासामुळे शक्य होणार नाही. आयपीएल संघात सामील झाल्यामुळे द्रविडला त्याच्या कुटुंबासोबत राहण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल कारण ही स्पर्धा फक्त दोन महिने चालते.

गंभीरच्या भूमिकेत दिसणार राहुल द्रविड?

लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर अलीकडेच फ्रँचायझी सोडून कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाला आहे. अशा परिस्थितीत एसएसजीला मार्गदर्शकाची गरज आहे. जे राहुल द्रविड चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो.

द्रविडकडे प्रदीर्घ प्रशिक्षणाचा अनुभव आहे. ज्यामुळे संघाला खूप मदत होऊ शकते. द्रविड एसएसजीमध्ये सामील होणार की नाही याचा निर्णय बीसीसीआयच्या बैठकीनंतर होणार आहे. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

द्रविडलाही या जुन्या संघाकडून मिळाली ऑफर

दुसरीकडे, 2008 ची आयपीएल चॅम्पियन राजस्थान रॉयल्स (RR) देखील त्यांच्यासोबत काम करण्यासाठी इच्छित आहे. राजस्थान रॉयल्सलाही त्याने संघाचा मेंटॉर बनवायचे आहे. द्रविड यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससोबत खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकेत दिसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT