rahul dravid on virat kohli century india vs england test 
क्रीडा

Ind vs Eng: विराटकडून शतक नाही विजयात वाटा हवा : राहुल द्रविड

जवळपास तीन वर्षांपासून कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.

Kiran Mahanavar

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना 1 जुलैपासून सुरू होत आहे. या सामन्यात भारताला रोहित शर्माची अनुपस्थिती जाणवू शकते. त्यामुळे भारतीय फलंदाजीची सर्व मदार विराट कोहलीवर असणार आहे. मात्र विराट कोहली गेल्या अडीच वर्षे शतकापासून वंचित आहे. त्याचा फॉर्मही चांगला नाही. यावरून त्याच्यावर टीका देखील होत आहे. (rahul dravid on virat kohli century india vs england test)

मात्र या सर्व परिस्थिती राहुल द्रविड यांनी वेगळेच मत मांडले. त्यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत विराट कोहलीला पाठिंबा दिला. द्रविडला त्याच्याकडून शतकाची अपेक्षाच नाही. विराट कोहलीबद्दल राहुल द्रविड म्हणतो, विराट कोहली वयाच्या तीशीत वेगळ्या मार्गाला लागलाय असे मला वाटत नाही. मी जेवढे त्याला पाहिले आहे तो कष्टाळू व्यक्ती आहे. ज्या प्रकारे तो सराव सामन्यात खेळला होता. तो आपल्या सर्व गोष्टी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करत होता.

द्रविड पूढे बोलतानी म्हणाले, प्रत्येक खेळाडू अशा टप्प्यांतून जातो. विराट कोहलीही यातून जात आहे. आता त्याला शतकवर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ नाही. लोक शतकाला यश म्हणून पाहतात, पण आपल्या विजयात सहभागी व्हायचे आहे. विराट कोहली जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये असतो तेव्हा तो अनेकांना प्रेरणा देतो.

विराट कोहली सध्या तरी खराब फॉर्ममधून जात आहे. जवळपास तीन वर्षांपासून कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. शेवटचे शतक त्याने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटीत केले होते. विराटला या वर्षांत भलेही शतक झळकावता आले नाही. 1 ते 5 जुलै दरम्यान खेळल्या जाणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत विराट कोहली भारताकडून खेळताना दिसणार आहे.

भारतीय संघ:

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा., मोहम्मद सिराज, उमेश यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये सहकार विभागाची अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT