rahul dravid sakal media
क्रीडा

द्रविड यांच्या नियुक्तीची औपचारिकता सुरू

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षपद स्वीकारण्यास राहुल द्रविड यांना मनवल्यानंतर बीसीसीआयने आज या पदाची जाहिरात काढून औपचारिकता सुरू केली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षपद स्वीकारण्यास राहुल द्रविड यांना मनवल्यानंतर बीसीसीआयने आज या पदाची जाहिरात काढून औपचारिकता सुरू केली. मुख्य प्रशिक्षकच नव्हे तर सपोर्ट स्टाफचीही नव्याने नियुक्ती होणार आहे. राहुल द्रविड हे सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचे प्रमुख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखानी भारत अ संघ आणि १९ वर्षांखालील संघांसाठी कार्यक्रम तयार केले जात आहेत. अनपेक्षित काही घडले नाही तर द्रविडच पुढचे मुख्य प्रशिक्षक असतील.

रवी शास्त्री या विश्वकरंडक स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षपद सोडणार असल्यामुळे बीसीसीआयने जाहिरात प्रसिद्ध करण्याअगोदर नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता. त्यात द्रविड यांच्यासह माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे नाव आघाडीवर होते; परंतु कुंबळे यांनी आपल्या फेरनियुक्तीत थेट नकार दिला. त्यामुळे बीसीसीसीआयची मोहीम द्रविड यांच्यावरच केंद्रीत झाली. द्रविडही या पदासाठी उत्सुक नव्हते. गांगुली यांनी पुढाकार घेत द्रविडला तयार केले.

प्रशिक्षकपदांसाठी अर्ज आल्यावर सल्लागार समिती बीसीसीआयच्या कार्यकारी समितीला योग्य उमेदवाराच्या नावाची शिफारस करेल, अशी प्रक्रिया असेल. २६ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे.मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत असणार आहे. विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांची मुदत ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर संपत आहे. फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी फारसा प्रभाव पाडलेला नाही. मात्र त्यांनी याच पदासाठी अर्ज केला, तर त्यांना मुदतवाढ मिळू शकते.

द्रविड यांनी बीसीसीआयच्या मागणीला सकारात्मकता दर्शवताना काही अटी घातल्याचे समजते. त्यानुसार त्यांनी गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी पारस म्हांबरे यांचे नाव पुढे केले आहे. म्हांबरे द्रविड यांच्याबरोबर अनेक वर्षे काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Changes: गणेशोत्सवात पुण्यात मोठा वाहतूक बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाला मुहूर्त, सात खासगी मिळकतींचा प्रश्न मार्गी; १० वर्षांचा तिढा सुटला

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

Marathi News Live Updates :गौतमी पाटलांविरोधात भाजप नेत्या आक्रमक, अश्लील हावभाव केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT