Rahul Dravid  esakal
क्रीडा

Rahul Dravid : शारीरिक ताकद नाही तर... कोच राहुल द्रविड दक्षिण अफ्रिका दौरा सर्वात आव्हानात्मक असं का म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Rahul Dravid : भारतीय संघ येत्या 10 डिसेंबरपासून दक्षिण अफ्रिकेत टी 20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघ नुकताच दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे. भारतीय संघाची हा दौरा डर्बन येथील पहिल्या टी 20 सामन्याने सुरू होणार आहे. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.

दरम्यान, भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने दक्षिण अफ्रिका दौऱ्याबाबत आपली मते पत्रकार परिषदेत सांगितली. दक्षिण अफ्रिकेतील खेळपट्ट्या या फलंदाजांसाठी आव्हानात्मक असतात त्यामुळे फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी करणे अपेक्षित आहे असं राहुल म्हणला.

'इथे फलंदाजी करणे आव्हानात्मक असते. आकडे तुम्हाला हेच सांगून जातात. फलंदाजी करण्यासाठी ही जागा सर्वात अवघड ठिकाणांपैकी एक आहे. विशेषकरून सेंच्युरियन आणि जोहान्सबर्गमध्ये मोठं आव्हान असतं. कायम खेळपट्टी काही ना काही करत असते. चेंडू वर खाली राहतो.'

'प्रत्येक खेळाडूकडे इथं कसं खेळायचं याचा प्लॅन असेल. जोपर्यंत ते याबाबत स्पष्टपणे विचार करत आहेत, त्याता सराव करत आहेत. तोपर्यंत हा प्लॅन ठिक आहे.' राहुल द्रविड म्हणाला की, अफ्रिकेत खेळण्यासाठी शारिरीक सक्षमता नाही तर मानसिक सक्षमता अधिक कामी येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT