Rahul Dravid Son Samit Dravid News Marathi News sakal
क्रीडा

Samit Dravid Video : वॉल एक्सप्रेस राहुल द्रविडचा मुलगा सुसाट! फायनल सामन्यात घातक गोलंदाजी अन्...

Rahul Dravid Son Samit Dravid News |

Kiran Mahanavar

Samit Dravid Video : भारताचे मुख्य प्रशिक्षक आणि वॉल एक्सप्रेस माजी फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडने अंडर-19 कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात घातक गोलंदाजी केली. त्याच्या वडिलांच्या विपरीत समितने फलंदाजीने नव्हे तर आपल्या घातक गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले. मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात कर्नाटककडून खेळताना समितने आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवले.

कर्नाटकने नाणेफेक जिंकून मुंबईविरुद्ध क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर समितने 19 षटकांत दोन महत्त्वाचे विकेट घेतले. त्याने मुंबईच्या धोकादायक दिसणाऱ्या आयुष सचिन वर्तकला 73 धावांवर बाद केले आणि त्यानंतर प्रतीक यादवला 30 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने 19 षटकांत दोन षटके मेडन टाकत 60 धावा दिल्या. मुंबईचा संघ अखेर 380 धावांवर बाद झाला. समितच्या गोलंदाजीच्या कामगिरीने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत.

समितने मुंबईविरुद्धच्या पहिल्या स्पेलमध्ये 10 षटके टाकली आणि 41 धावा दिल्या. मात्र, त्यानंतर त्याने नऊ षटकांत केवळ 19 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. समित गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

त्याने नुकतीच जम्मू-काश्मीरविरुद्ध 98 धावांची इनिंग खेळली होती. कर्नाटककडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 159 चेंडूत 98 धावा केल्या. यामध्ये 13 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. स्पर्धेच्या चालू हंगामात समितने सात सामन्यांत 37.78 च्या सरासरीने 340 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. या 18 वर्षीय खेळाडूने तीन विकेट्सही घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT