Rahul Dravid Statement About Mohammed Shami  esakal
क्रीडा

Jasprit Bumrah : राहुल द्रविडने बोलता - बोलता बुमराहच्या रिप्लेसमेंटबाबत दिले संकेत

अनिरुद्ध संकपाळ

Rahul Dravid Statement About Mohammed Shami : दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा 49 धावांनी पराभव केला. या सामन्यात देखील भारताच्या गोलंदाजीमधील मर्यादा उघड झाल्या. भारताला जसप्रीत बुमराहची उणीव भासत आहे. बुमराह टी 20 वर्ल्डकपला देखील मुकला आहे. त्यामुळे आता त्याची योग्य रिप्लेसमेंट कोणती ही डोकेदुखी संघ व्यवस्थापनासमोर असणारच आहे. दरम्यान, संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने याबाबत पोस्ट मॅच प्रझेंटेशनमध्ये बोलताना मोठे संकेत दिले. हे संकेत मोहम्मद शमीबाबत आहेत.

राहुल द्रविडने जसप्रीत बुमराहच्या रिप्लेसमेंटबाबचा अंतिम निर्णय हा मोहम्मद शमी कोरोनावर मात करून तंदुरूस्त झाल्यानंतर घेण्यात येईल असे सांगितले. मोहम्मद शमी कोरोनाग्रस्त झाल्याने त्याला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते.

याबाबत राहुल द्रविड म्हणाला, 'हे पहा आमच्याकडे 15 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे. मोहम्मद शमी हा स्टँड बायमध्ये आहे. दुर्दैवाने तो कोरोनामुळे दोन्ही मालिका खेळू शकला नाही. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत देखील नाहीये. आम्हाला तो कोरोनामधून कशा प्रकारे सावरत आहे याबाबतची माहिती घेणे गरजेचे आहे. त्याला कोरोना होऊन 14 ते 15 दिवस झाले आहेत. आता त्याची प्रकृती कशी आहे याची माहिती घेणे गरजेचे आहे. ज्यावेळी तो कशा प्रकारे या आजारपणातून बाहेर पडत आहे याची माहिती मिळाली की संघ व्यवस्थापन आणि निवड समिती याबाबत एका निर्णयाप्रत येऊ.'

जसप्रीत बुमराहच्या रिप्लेसमेंटसाठी ते कोणाकडे पाहत आहेत असे विचारले असता द्रविडने 'बुमराहच्या रिप्लेसमेंटने यावं आणि चांगलं क्रिकेट खेळावं, खेळाचा आनंद घ्यावा त्याचा सर्वोत्तम खेळ करावा हीच अपेक्षा आम्ही लोकांकडून करत आहोत.'

द्रविडने ऑस्ट्रेलियाला लवकर जाण्याबाबत देखील आपले मत मांडले. तो म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या वेग आणि उसळीच्या बाबतीत वेगळ्या आहे. आमच्या संघातील अनेक खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात टी 20 क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळे त्यांना चांगला सराव मिळावा आणि परिस्थितीशी जुळवून घेता यावे यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियात लवकर (6 ऑक्टोबर) दाखल होणार आहोत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT