rahul tripathi sakal
क्रीडा

'स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटत...' टीम इंडियात संधी मिळताच Rahul Tripathi भावूक

राहुल त्रिपाठी पहिल्यांदाच संघात निवडल्यामुळे खूप आनंदी झाला

Kiran Mahanavar

Rahul Tripathi : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. राहुल त्रिपाठीचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने अलीकडेच आयपीएलच्या 15 व्या हंगामात चांगली फलंदाजी केली होती. टीम इंडियाला आयर्लंडमध्ये यजमान संघाविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. राहुल त्रिपाठी पहिल्यांदाच संघात निवडल्यामुळे खूप आनंदी झाला आहे. स्वप्न सत्याता उतरल्यासारखं त्याला वाटत आहे.(rahul tripathi dream come true on maiden team india call up ireland)

आयपीएलच्या इतिहासात 31 वर्षीय राहुल त्रिपाठी अनकॅप्ड खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 1798 धावा केल्या आहेत. त्यांच्या मागे मनन वोहरा 1073 धावा करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मनविंदर बिस्ला 798 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2022 मध्ये, राहुलने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 14 सामन्यात 413 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 158.24 होता.

टीम इंडियाच्या टी-20 संघात सामील झाल्यानंतर राहुल बोलताना म्हणाला, माझ्यासाठी ही मोठी संधी आहे. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटत आहे. निवडकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला याचा मला आनंद होत आहे. माझ्या मेहनतीचे फळ मला मिळाले आहे. मला खेळण्याची संधी मिळाली तर मी सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करेन.

  • आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ -
    हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT