Team India and Raj Thackeray  
क्रीडा

भारतीय संघाच्या पाकिस्तानवरील विजयावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - India Vs Pakistan T20 World Cup 2022 : भारताने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. या विजयामुळे भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. सर्व स्तरातून भारतीय खेळाडूंचं कौतुक होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील भारताच्या विजयावर प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे म्हणाले की, पाकिस्तानच्या विरुद्ध भारताने आज मिळवलेला विजय हा अविस्मरणीय आहे ! भारतीय संघाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत जो विजय मिळवला त्याला तोड नाही. येणाऱ्या सगळ्या सामन्यांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा, असंही राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.

आजच्या सामन्यात विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. त्याने हार्दिक पांड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत गेलेला सामना खेचून आणला. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत सामना संपवला. या रोमहर्षक विजयाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

भारताच्या विजयानंतर पुण्यातही मध्यवर्ती भागात क्रिकेट चाहत्यांनी जलोष केला. गुडलक चौक आणि एफसी रोडवर मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिस देखील क्रिकेट चाहत्यांसोबत थिरकताना दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT