Rajat Patidar Debut Ind vs Eng Test sakal
क्रीडा

Rajat Patidar Debut Ind vs Eng Test : ...अखेर प्रतीक्षा संपली; पाटीदार झाला टीम इंडियाचा भागीदार! टीम इंडियात 3 मोठे बदल

India vs England Test Series News 2024 :

Kiran Mahanavar

Rajat Patidar Debut Ind vs Eng Test : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून म्हणजेच 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. इंग्लंड हैदराबाद कसोटी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर रोहित शर्मा आणि ब्रिगेडला मालिकेत पुनरागमन करायचे आहे. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर आहेत.

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. या सामन्यातून रजत पाटीदार कसोटी पदार्पण करत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. केएल राहुल दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला असून त्याच्या जागी रजत पाटीदारला संधी देण्यात आली आहे. रवींद्र जडेजाच्या जागी कुलदीप यादवचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी मुकेश कुमार या सामन्यात खेळणार आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश आणि जसप्रीत बुमराह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT