Ram Temple Pran Pratishtha esakal
क्रीडा

Ram Temple Pran Pratishtha : हमनप्रीत कौरलाही मिळालं अयोध्येतील रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यांच निमंत्रण

अनिरुद्ध संकपाळ

Ram Temple Pran Pratishtha : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिरातील श्री रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण भारतातील अनेक सेलिब्रेटी आणि खेळाडूंना देण्यात आलं आहे. आज भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला देखील या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे.

यापूर्वी महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रविचंद्रन अश्विन, मिथाली राज यांना देखील अयोध्येतील रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. त्यात आता हरमनप्रीत कौरची देखील भर पडली आहे. क्रिकेटपटूंसोबतच अक्षय कुमार, कंगना रनौत, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, हरीहरण, रजनीकांत, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट आणि रणदीप हुड्डा यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे.

रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा हा एक आठवड्यापूर्वीच सुरू झाला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले की राम मंदिर हे 23 जावेवारीपासून सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे.

ते म्हणाले की, 'अयोध्येतील रामलल्लांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा हा दुपारी 1 वाजेपर्यंत संपण्याची शक्यता आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर प्रतिष्ठित लोकं उपस्थित असणार आहे. मोदी सोहळ्यानंतर भाषण देखील करणार आहेत. परंपरेनुसार नेपाळमधील जनकपूर आणि मिथिलामधून भेटवस्तूंच्या 1000 बास्केट येणार आहेत. 20 जानेवारी आणि 21 जानेवारीला सर्वासामन्यांसाठी अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT