Ramiz Raja  esakal
क्रीडा

Ramiz Raja : पाकिस्तानचा सिलेक्टर मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये होता.... रमीझ राजांनी काढला चिमटा

अनिरुद्ध संकपाळ

Ramiz Raja Salman Butt : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वनडे वर्ल्डकपनंतर अनेक मोठे बदल झाले आहेत. संघाच्या कर्णधारापासून निवडसमितीपर्यंत सर्वत्र हे बदल दिसून येत आहेत. बाबर आझमने राजीनामा दिला असून वनडे, टी 20 आणि कसोटीसाठी वेगवेगळा कर्णधार नेमण्यात आला आहे.

तसेच निवडसमिती अध्यक्षपद देखील वहाब रियाझकडे सोपवण्यात आलं आहे. त्याच्या नेतृत्वाखालील निवडसमितीत पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट आणि कामरान अकमल, राव इफ्तिकार अंजूम यांचा देखील समावेश आहे.

मात्र याच निवडसमितीमुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये वादंग निर्माण झालं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी चेअरमन रमीझ राजा यांनी या निवडसमितीवर नाराजी व्यक्त केली आहे.

क्रिकबझशी बोलताना रमीझ राजा (Ramiz Raja) म्हणाले की, 'हे खूप भयानक आहे. एका निवडसमिती सदस्याच्या कोणताही निर्णयानंतर नातेसंबंधाची चर्चा होईल. दुसरा निवडसमिती सदस्य हा तर मॅच फिक्सिंगसाठी जेलमध्ये गेला होता.'

सलमान बट, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ यांच्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दीर्घकाळ बंदी घालण्यात आली होती.

पीसीबीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, 'सलमान बट, कामरान अकमल, राव इफ्तिकार अंजूम यांची तात्काळ प्रभावाने निवडसमिती सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची निवडसमिती सदस्य म्हणून पहिलं काम हे न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ निवडणं हे असणार आहे. ही मालिका 12 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे.'

रमीझ राजा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरून पाकिस्तानी गोलंदाजांवर कडाडून टीका केली होती. 'जर तुम्ही नव्या चेंडूवर विकेट घेऊ शकत नाही तर तुम्ही महाग गोलंदाज होणार हे नक्की. बाबर आझम काय खाऊन कॅप्टन्सी करेल ज्यावेळी गोलंदाज विकेट घेत नाहीयेत आणि धावा देण्याचे विश्वविक्रम प्रस्थापित करत आहेत.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT