Ramiz Raja Singer Yohani Video esakal
क्रीडा

Ramiz Raja Singer Yohani Video : हा मुझे प्यार है तुमसें हा... रमीझ राजांच छुपं टॅलेंट श्रीलंकन सिंगरसमोर आलं बाहेर

अनिरुद्ध संकपाळ

Ramiz Raja Singer Yohani Video : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी चेअरमन रमीझ राजा हे सध्या समालोचनाच्या जगात रमले आहेत. पीसीबीचे चेअरमनपद सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा माईक हातात घेतला आहे. ते सध्या श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये माईक हातात घेऊन समालोचन करत आहे. मात्र या दरम्यान, त्यांच्यातील एक सुप्त गुण देखील सर्वांसमोर आला.

श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये अनेक पाकिस्तानी क्रिकेटपूट सहभागी झाले आहेत. याचबरोबर पीसीबीचे माजी चेअरमन रमीझ राजा हे देखील समालोचक म्हणून श्रीलंकन प्रीमियर लीगला चार चांद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या गाण्याचं छुपं टॅलेंट दाखवत सर्वांना आश्चर्यचकीत केलं. (Ramiz Raja Sri Lanka Premier League)

रमीझ राजांचा हा सिंगिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ते प्रसिद्ध श्रीलंकन गायिका योहानी सोबत तिचं गाजलेलं गाणं मानिके मागे हिते याचे हिंदी व्हर्जन गायले. (Ramiz Raja Singing Video News)

रमीझ राजा यांना पीसीबी चेअरमन पदावरून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या जागी नजम सेठी हे अंतरिम चेअरमन जाले होते. रमीझ राजांचे पद हे इंग्लंडने कसोटी मालिकेत पाकिस्तानला पाकिस्तानातच 3 - 0 असा व्हाईट वॉश दिल्यानंतर गेलं होतं.

रमीझ राजा हे पीसीबीचे चेअरमन म्हणून 15 महिने पदावर होते. त्यांची नियुक्ती ही तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी सप्टेंबर 2021 मध्ये केली होते.

रमीझ राजा हे पीसीबीचे 36 वे चेअरमन होते. त्यांनी एहसान मनी यांच्याकडून पदाची सूत्रे स्विकारली होती. ते चौथे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आहेत ज्यांनी पीसीबीचे चेअरमन पद भुषवले. यापूर्वी इजाझ बट्ट (2008-11), जावेद बुराकी (1994-95), अब्दुल हाफिज कारदार (1972-77) या माजी खेळाडूंनी पीसीबी चेअरमन पद भुषवलं होतं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT