राणी रामपाल 
क्रीडा

जगातील सर्वोत्तम क्रीडापटूचा राणीला पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिची जगातील सर्वोत्तम क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जगातील विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ या पुरस्कारासाठी आपल्या एका खेळाडूची शिफारस करतात. त्यातून एकाची निवड होते. यावेळी 25 क्रीडापटूंत राणी सरस ठरली.

या वर्ल्ड गेम ऍथलीट पुरस्कारासाठी मतदान होते. त्यात राणीला सर्वाधिक 1 लाख 99 हजार 477 मते मिळाली असल्याचे जागतिक हॉकी महासंघाने कळवले आहे. टोक्‍यो ऑलिंपिकसाठी भारतीय महिला हॉकी संघास पात्र ठरण्यात राणीने मोलाची भूमिका बजावली होती. यात क्रीडा कौशल्याइतकेच सामाजिक बांधिलकी, तसेच मैदानातील वर्तणुकीस महत्त्व देण्यात येते.

राणीने यंदा कराटे स्टार स्टॅनिस्लाव होरुना (युक्रेन), पॉवरलिफ्टिंग विजेती रेहा स्टीन (कॅनडा) यांना मागे टाकले आहे. गतवर्षी मारिला चेर्नोवा जिओर्गिल पॅतारिया (रशिया) या जिम्नॅस्ट जोडीने हा पुरस्कार मिळवला होता.

हा केवळ माझा नव्हे तर माझ्या संघाचा आणि देशाचा गौरव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरीचे कौतुक झाल्यामुळे जास्त आनंद होत आहे. ऑलिंपिक पात्रता साध्य केल्यामुळे 2019 संस्मरणीय झाले. आता 2020 त्यापेक्षाही जास्त चांगले करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे राणी रामपालने सांगितले.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow E-attendance: गायींनाही आता ई-अटेंडन्स द्यावा लागणार! एक विशेष मायक्रोचिप विकसित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi Horoscope Prediction : आजपासून फक्त 24 दिवसांमध्ये बदलणार 'या' राशींचं नशीब ! बक्कळ श्रीमंतीचा योग

वाहतुकीचा ‘नवा अध्याय’ लिहिला जाणार! गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे कोंडीतून दिलासा मिळणार! नवी मुंबई काही मिनिटांत गाठता येणार!

November 2025 Horoscope : नव्या आठवड्यात 'या' 3 राशींच्या लोकांचा होणार फायदाच फायदा..घरी येणार पैसा-गुडलक, तुमची रास आहे का?

Latest Marathi News Update : वर्ल्ड कप फायनलमध्ये शफाली वर्माचे अर्धशतक, स्मृती मानधनासोबत केली शतकी भागीदारी

SCROLL FOR NEXT