Ranji Cricket Trophy 2022 Azim kazi century reverses Maharashtra lead 114 runs  sakal
क्रीडा

Ranji Trophy : अझीमच्या शतकामुळे महाराष्ट्राचा उलटवार

रणजी क्रिकेट करंडक; ११४ धावांची आघाडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ॠतुराज गायकवाड, अंकित बावणे यांच्याशिवाय मैदानात उतरणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या स्टार खेळाडूंनी दिल्ली संघाविरुद्धच्या रणजी क्रिकेट करंडकातील ब गटाच्या लढतीत ठसा उमटवला. दिल्लीचा पहिला डाव १९१ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या दिवसअखेरीस ७ बाद ३०५ धावा केल्या असून आता त्यांच्याकडे ११४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे. अझीम काझीच्या नाबाद ११९ धावांसह आशय पालकर याने झळकावलेल्या नाबाद ९४ धावा हे बुधवारच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले.

दिल्लीचा पहिला डाव १९१ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर महाराष्ट्राने पहिल्या दिवसअखेरीस ५ बाद ८० धावा केल्या होत्या. महाराष्ट्राने तेथून पुढे दुसऱ्या डावाची सुरुवात बुधवारी केली. नौशाद शेख ४५ धावांवर बाद झाला. सौरभ नवाळेही ९ धावांवरच बाद झाला. त्यामुळे महाराष्ट्राची अवस्था ७ बाद ९४ धावा अशी झाली.

२११ धावांची अभेद्य भागीदारी

अझीम काझी व आशय पालकर या जोडीने आठव्या विकेटसाठी २११ धावांची अभेद्य भागीदारी रचताना दिल्लीच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अझीमने २६० चेंडूंमध्ये नाबाद ११९ धावांची संस्मरणीय खेळी साकारली. आशयने २४० चेंडूंमध्ये नाबाद ९४ धावांची संयमी खेळी केली. दिल्लीकडून सिमरजीत सिंगने तीन, तर मयांक यादवने दोन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः दिल्ली - पहिला डाव सर्व बाद १९१ धावा (ध्रुव शोरी ४१, हिम्मत सिंग ४९, मनोज इंगळे ५/४३, राजवर्धन हंगरगेकर ३/५८) वि. महाराष्ट्र - पहिला डाव ७ बाद ३०५ धावा (नौशाद शेख ४५, अझीम काझी नाबाद ११९ - २६० चेंडू, १२ चौकार, २ षटकार, आशय पालकर नाबाद ९४ - २४० चेंडू, ११ चौकार, २ षटकार, सिमरजीत सिंग ३/५८).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT