Ranji Trophy 2022 Gujarat vs Madhya Pradesh Sakal
क्रीडा

Ranji Trophy : क्लास कॅच; व्हिडिओ एकदा बघाच

सुशांत जाधव

Gujarat vs Madhya Pradesh, Elite Group A : भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी स्पर्धेला सुरुवात झाली आह. जैवसुरक्षित वातावरणात देशातील वेगवेगळ्या मैदानात स्पर्धा खेळवण्यात येत आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राजकोटच्या मैदानात गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामना रंगला आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार प्रियांक पांचाल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

गुजरातच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत मध्य प्रदेशचा डाव 274 धावांत आटोपला. गुजरातकडून गागवसवाला (Arzan Nagwaswalla) याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या बाजूला रुष कलारिया (Roosh Kalaria) आणि Chintan Gaja यांनी प्रत्येकी दोन तर सिद्धार्थ देसाईनं एक विकेट घेतली. रुष कलारिया याने 19 षटकात 52 धावा खर्च करुन दोन विकेट घेतल्या. त्याने 5 निर्धाव षटकेही फेकली. त्याने ज्या दोन विकेट्स घेतल्या त्यातील यश दुबेच्या विकेटचाही समावेश होता.

कलारिया याने स्वत:च्या गोलंदाजीवर उत्कृष्ट कॅच घेत यश दुबेला तंबूचा रस्ता दाखवला. दुबेनं 69 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. याशिवाय अर्धशतकी खेळी करणाऱ्या रजत पाटीदार यालाही त्याने बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT