Ajinkya Rahane Marathi News sakal
क्रीडा

Ranji Trophy : उशिरा का होईना... कर्णधार अजिंक्य रहाणेची बॅट चमकली! मुंबई पहिल्या स्थानावर कायम

Ranji Trophy Ajinkya Rahane Half Century Mumbai Vs Chattisgarh : मुंबई-छत्तीसगड यांच्यामधील रणजी क्रिकेट करंडकातील एलिट ‘ब’ गटातील लढत सोमवारी अनिर्णित राहिली.

Kiran Mahanavar

Ranji Trophy Ajinkya Rahane : मुंबई-छत्तीसगड यांच्यामधील रणजी क्रिकेट करंडकातील एलिट ‘ब’ गटातील लढत सोमवारी अनिर्णित राहिली. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नाबाद ५६ धावा अखेरच्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरल्या. मुंबईच्या संघाचा या गटातून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का आहे. आता मुंबईचा संघ ३० गुणांसह पहिल्या स्थानावर असून छत्तीसगडचा संघ १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

मुंबईच्या संघाने सोमवारी १ बाद ९७ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. मुंबईने ६ बाद २५३ धावांपर्यंत मजल मारली. पृथ्वी शॉ ४५ धावांवर रविवारीच बाद झाला होता. अमोघ भटकळ २४ धावांवर बाद झाला. भूपेन लालवानी याने ५९ धावांची खेळी केली.

सातव्या डावात पहिले अर्धशतक

सुमार फॉर्ममुळे भारताच्या कसोटी संघातून डावलण्यात आलेल्या अजिंक्य रहाणेला यंदाच्या रणजी मोसमातही अपयशाला सामोरे जावे लागत आहे. चार सामन्यांमधून सातव्या डावात त्याला पहिले अर्धशतक साजरे करता आले.

अजिंक्यने १२४ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ५६ धावांची खेळी साकारली. सूर्यांश शेडगे याने २६ धावांची व शार्दुल ठाकूर याने ३१ धावांची खेळी करीत त्याला साथ दिली. छत्तीसगडकडून अजय मंडल याने ६५ धावा देत मुंबईचा निम्मा संघ गारद केला.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई- पहिला डाव ३५१ धावा आणि दुसरा डाव ६ बाद २५३ धावा (पृथ्वी शॉ ४५, भूपेन लालवानी ५९, अजिंक्य रहाणे नाबाद ५६, सूर्यांश शेडगे २६, शार्दुल ठाकूर ३१, अजय मंडल ५/६५) छत्तीसगड - पहिला डाव ३५० धावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT