Baroda Cricketer Vishnu Solanki  Sakal
क्रीडा

मुलीनंतर आता वडील गेल्याचा फोन आला...विष्णू सुन्न झाला

सकाळ डिजिटल टीम

बडोद्याच्या क्रिकेटरला वैयक्तिक आयुष्यात एका मागून एक असे दोन मोठे धक्के बसले आहेत. आपल्या एका दिवसाच्या मुलीला गमावल्यानंतर स्टेट संघासाठी विष्णू सोलंकी (Vishnu Solanki) मैदानात उतरला. त्याने शतकी खेळी करुन सामना अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटाही उचलला. पण या दु:खातून सावरण्याआधीच वडील गेल्याची वार्ता त्याच्या कानावर पडली. एका माणसाच्या आयुष्यात किती वादळे यावीत, असा भावनिक प्रश्न या घटनेमुळे क्रिकेट चाहत्यालाच नव्हे तर ही बातमी ऐकणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच पडेल. हा क्रिकेट अगदी नाजूक परिस्थितीचा सामना सध्या करताना दिसतोय. (Ranji Trophy Baroda Cricketer Vishnu Solanki Plays Despite Losing Father Just Weeks After Daughters Death)

आधी नवजात मुलीला गमावलं

10 फेब्रुवारी विष्ण सोलंकीच्या पत्नीनं एका मुलीला जन्म दिला. त्यावेळी विष्ण बडोदा संघासबोत रणजी ट्रॉफीसाठी बडोद्याला होता. ही आनंदाची बातमी त्याला 24 तासांच्या आत मोठा धक्का देऊन गेली. नवजात मुलीनं 11 फेब्रुवारी 2022 रात्रीच्या वेळेस प्राण सोडले. मुलीला बघायला जाण्याची स्वप्न बाळगणाऱ्या बापाला तिच्या अंत्यविधीला जाण्याची वेळ आली. या घटनेनंतर भुवनेश्वर घरी आला. मुलीवरील अंत्यसंस्कार करुन तो बडोदा क्रिकेट संघाला जॉईनही झाला. पण चंदीगड विरुद्धच्या ज्या सामन्यात त्याने शतक केले. त्या सामन्यानंतर त्याला वडील गेल्याची बातमी मिळाली.

लढवय्या बापानंच आता गमावला बाप...

वडील गेल्याचे वृत्त समजल्यानंतर बडोदा असोसिएशनने त्याला घरी जाण्याची परवानगीही दिली होती. पण त्याने संघासोबत राहण्याचा पर्याय निवडला. मॅच ड्रॉ झाल्यानंतर विष्णू सोलंकीनं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातूनच वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात भाग घेतला. विष्णू सोलंकीच्या वडिलांवर गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरु होते. त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT