ranji sakal
क्रीडा

Ranji Trophy : बंगालचा डाव १९९ धावांवर आटोपला ; रणजी क्रिकेट करंडक,मुंबईकडे २१३ धावांची आघाडी

सूर्यांश शेडगे, शिवम दुबे, तनुष कोटियन यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ४१२ धावा तडकावल्या. याला प्रत्युत्तर देणाऱ्या बंगालचा पहिला डाव १९९ धावांवर आटोपला. रणजी क्रिकेट करंडकातील ब गटातील लढतीत दुसऱ्या दिवसअखेरीस मुंबई संघाने वर्चस्व कायम राखले.

सकाळ वृत्तसेवा

कोलकाता : सूर्यांश शेडगे, शिवम दुबे, तनुष कोटियन यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ४१२ धावा तडकावल्या. याला प्रत्युत्तर देणाऱ्या बंगालचा पहिला डाव १९९ धावांवर आटोपला. रणजी क्रिकेट करंडकातील ब गटातील लढतीत दुसऱ्या दिवसअखेरीस मुंबई संघाने वर्चस्व कायम राखले. आता त्यांच्याकडे २१३ धावांची आघाडी आहे.

मुंबईच्या संघाने ६ बाद ३३० या धावसंख्येवरून शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली. तनुष कोटियन व अथर्व अंकोलेकर या जोडीने सातव्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करताना बंगालच्या गोलंदाजांचे आव्हान लीलया परतवून लावले. मोहम्मद कैफने अथर्वला ४६ धावांवर बाद करीत जोडी तोडली. तनुष याने ९ चौकार व १ षटकारासह ६७ धावांची खेळी केली. सूरज जयस्वालच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. मुंबईने पहिल्या डावात ४१२ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक :मुंबई - पहिला डाव ४१२ धावा (सूर्यांश शेडगे ७१, शिवम दुबे ७२, तनुष कोटियन ६७, अथर्व अंकोलेकर ४६, रॉयस्टन डियास नाबाद ४६, सूरज जयस्वाल ६/१२४) वि. बंगाल - पहिला डाव सर्व बाद १९९ (अनुस्तुप मजुमदार नाबाद १०८, मोहित अवस्थी ३/६३).

अनुस्तुपची शतकी खेळी

बंगालच्या फलंदाजांना पहिल्या डावात ठसा उमटवता आला नाही; पण अनुस्तुप मजुमदार याने १२७ चेंडूंमध्ये १२ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १०८ धावांची खेळी साकारली. त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. बंगालला पहिल्या डावात १९९ धावाच करता आल्या. मोहित अवस्थीने ६३ धावा देत तीन फलंदाज बाद केले. रॉयस्टन डियास व शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. या लढतीचे दोन दिवस अद्याप बाकी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला मोठा धक्का! अन्नामलाईंनंतर आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ, 'या' पक्षात करणार प्रवेश...

Mumbai Traffic: मुंबईकरांसाठी मोठा बदल! BKC मध्ये कार आणि बाईकला दर शुक्रवारी प्रवेशबंदी; कठोर नियमाचं कारण काय?

Pune Crime: बिबवेवाडीत डिलिव्हरी बॉयला धमकावून मारहाण; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोघे अटकेत

IND vs AFG, ODI : रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? त्या Viral Video मुळे मिळालं स्पष्ट उत्तर

Pachod Crime : अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या आठ चालक मालकाविरुद्ध गुन्हा; वाळूसह सव्वा तेहतीस लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT