Ranji Trophy Bihar  esakal
क्रीडा

Ranji Trophy Bihar : येरे माझ्या मागल्या... पुन्हा बिहारचे दोन संघ उतरणार मैदानावर

अनिरुद्ध संकपाळ

Ranji Trophy Bihar : बिहार क्रिकेट असोसिएशनचा गोंधळ काही केल्या संपत नाहीये. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात मुंबईविरूद्ध बिहार क्रिकेट असोसिएशनच्या दोन टीम मैदानावर आल्या होत्या. त्यामुळे गोंधळ झाला अन् सामना उशिरा सुरू झाला.

अनेक वर्षांच्या बंदीनंतर बिहारचा संघ पुन्हा रणजी ट्रॉफी खेळत आहे. मात्र मुंबई विरूद्धच्या सामन्यात गोंधळ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील बिहारचे येरे माझ्या मागल्या सुरूच राहणार आहे. छत्तीसगडविरूद्ध देखील बिहारचे दोन संघ मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

पहिल्या मुंबईविरूद्धच्या सामन्यात बिसीए अध्यक्ष यांनी निवडलेला संघ आणि सचिव असलेला दावा करणाऱ्या अमित कुमार यांचा संघ मैदानावर आला होता. मात्र अमित कुमारच्या संघाला मैदानात घुसू दिलं नाही. वाद वाढला अन् प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं होतं. आता दुसऱ्या सामन्यात देखील हीच परिस्थीत होऊ शकते.

अमित कुमार यांनी टीमची लिस्ट ही बीसीसीआयला पाठवली असून अमित कुमार हे खगडिया जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि खासदार डॉ. संजीव यांच्यासोबत देखील बैठक बोलावली.

बिसीएचा वाद काय?

बिहारकडून प्रत्येक रणजी सामन्यात दोन संघ येण्याचं कारण म्हणजे बिहार क्रिकेट असोसिएशन आणि सचिव अमित कुमार यांच्यातील वाद आहे. बिसीएने सांगितलं आहे की सचिव अमित कुमार यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. मात्र हा निर्णय अमित कुमार यांना मान्य नाहीये.

त्यांच म्हणणं आहे की ते निवडणूक लढून ते बिसीएचे सचिव झाले आहे. तुम्ही सचिवाला असं निलंबित करू शकत नाही. यावर माजी खेळाडू आदित्य वर्माने सांगितले की बिसीए अध्यक्ष राकेश तिवारी सर्व अधिकार आपल्या हातात ठेवू इच्छितात.

(Sports Latest New)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT