Ranji Trophy Date announced would be held in two phases Pre and Post IPL
Ranji Trophy Date announced would be held in two phases Pre and Post IPL  esakal
क्रीडा

रणजी ट्रॉफी भाग 1, भाग 2 च्या तारखा झाल्या जाहीर

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय क्रिकेट वर्तुळातील सर्वात प्रतिष्ठेची आणि महत्वाची स्पर्धा रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) दोन भागात खेळवली जाणार आहे याची घोषणा बीसीसीआय (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) यांनी यापूर्वीच केली होती. आता या दोन भागात खेळवल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या तारखा (Ranji Trophy Schedule) देखील जाहीर झाल्या आहेत. रणजी ट्रॉफीचा पहिला भाग हा 10 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत म्हणजे आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी होणार आहे. तर दुसरा भाग आयपीएल 2022 नंतर 30 मे ते 26 जून या दरम्यान खेळवला जाईल. यंदाच्या हंगामात ६२ दिवसात ६४ रणजी ट्रॉफी सामने होतील. (Ranji Trophy Date announced would be held in two phases Pre and Post IPL)

रणजी ट्रॉफीचा हंगाम जाहीर केल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, 'मला हे सांगयला आनंद होत आहे की आम्ही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट (Domestic Cricket) पुन्हा रूळावर आण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. पुढच्या महिन्यात धमाकेदार क्रिकेट अॅक्शन आपल्याला पहायला मिळणार आहे. आम्ही कोरोना महामारीवर नियंत्रण येण्याची वाट बघत होतो. आता आमचे क्रिकेटपटू पुन्हा मध्यभागी असतील.'

जय शहा पुढे म्हणाले की, 'आम्ही संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी रणजी ट्रॉफीचे सामने 9 ठिकाणी खेळवणार आहोत. आम्ही बायो सिक्युर बबलवर मोठा ताण येणार नाही याची काळजी घेत आहोत.' रणजी ट्रॉफीमध्ये आठ एलिट ग्रुप (Elite Groups) आणि एक प्लेट ग्रुप (Plate Group) आहे. प्रत्येक एलिट ग्रुपमध्ये चार संघ असतील तर प्लेट ग्रुपमध्ये सहा संघांचा समावेश असेल. प्रत्येक एलिट ग्रुपमधील टॉपचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT