ranji trophy dhivam Dube Shams Mulani Mumbai team lead by 177 runs Sakal
क्रीडा

Ranji Trophy : शिवम दुबे, ‍शम्स मुलानीने सावरले; मुंबईचा संघ १७७ धावांनी पुढे; अखेरचा दिवस निर्णायक

पहिल्या तीन लढतींत दणदणीत विजय साकारणाऱ्या मुंबईच्या क्रिकेट संघाला रणजी करंडकाच्या यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच खडतर आव्हानाला सामोरे जावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पहिल्या तीन लढतींत दणदणीत विजय साकारणाऱ्या मुंबईच्या क्रिकेट संघाला रणजी करंडकाच्या यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच खडतर आव्हानाला सामोरे जावे लागले. उत्तर प्रदेशविरुद्धच्या ब गटातील लढतीत

दुसऱ्या डावात ६ बाद ८६ धावा अशा संकटात असताना शिवम दुबे (११७ धावा) व शम्स मुलानी (६३ धावा) यांनी १७३ धावांची भागीदारी रचली आणि मुंबईचा डाव सावरला. मुंबईने तिसऱ्या दिवसअखेरीस ८ बाद ३०३ धावा फटकावल्या असून आता हा संघ १७७ धावांनी पुढे आहे. या लढतीचा अखेरचा दिवस उद्या (ता. २९) असणार आहे. मुंबई व उत्तर प्रदेश या दोघांसाठी सोमवारचा दिवस निर्णायक असेल.

मुंबईचा पहिला डाव १९८ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर उत्तर प्रदेशने पहिल्या डावात ३२४ धावा फटकावल्या. मुंबईने दुसऱ्या डावात बिनबाद २४ धावा केल्या होत्या. मुंबईच्या फलंदाजांनी रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. जय बिस्ता (२१ धावा), भुपेन लालवानी (२७ धावा), सुवेद पारकर (८ धावा), तनुष कोटियन (३ धावा), प्रसाद पवार (४ धावा) व अजिंक्य रहाणे (९ धावा) यांच्याकडून सपशेल निराशा झाली. कर्णधार अजिंक्य रहाणेचे अपयश या डावातही कायम राहिले.

महत्त्वपूर्ण भागीदारी

मुंबईचा पाय खोलात गेला असताना शिवम दुबे व शम्स मुलानी या जोडीने १७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दुबे याने १३० चेंडूंमध्ये ९ चौकार व ६ षटकारांसह ११७ धावांची खेळी साकारली. मुलानी याने २ चौकार व एक षटकारासह ६३ धावांची खेळी केली. दिवसाच्या अखेरच्या सत्रात दोघेही बाद झाले. आता मोहित अवस्थी ३४ धावांवर, तर सिल्वेस्टर डिसोजा २ धावांवर खेळत आहेत.

दोन्ही संघांना संधी

या लढतीचा अखेरचा दिवस उद्या असणार आहे. दोन्ही संघांना विजयाची समसमान संधी असेल. मुंबईचे उर्वरित दोन विकेट झटपट बाद करून उत्तर प्रदेशचा संघ विजय मिळवण्याचा प्रयत्न करील. मुंबईचा संघही आणखीन धावांची भर घालून उत्तर प्रदेशवर दबाव टाकवण्याचा प्रयत्न करील.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई - पहिला डाव सर्व बाद १९८ धावा आणि दुसरा डाव ८ बाद ३०३ धावा (जय बिस्ता २१, भुपेन लालवानी २७, शिवम दुबे ११७ - १३० चेंडू, ९ चौकार, ६ षटकार, शम्स मुलानी ६३, मोहित अवस्थी खेळत आहे ३४, सिल्वेस्टर डिसोजा खेळत आहे २, आकिब खान ३/५३) वि. उत्तर प्रदेश - पहिला डाव सर्व बाद ३२४ धावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

मी दमलीये! लग्नानंतर आशुतोष यांच्या पाहुण्यांना कंटाळलेल्या रेणुका शहाणे; शेवटी एके दिवशी रागात...

AAP Bihar Candidate List : बिहार निवडणुकीसाठी 'AAP'ने वाजवला बिगुल!, पहिली उमेदवार यादी केली जाहीर

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT