Ranji Trophy Final Madhya Pradesh Solid Start In First Inning Against Mumbai esakal
क्रीडा

Ranji Trophy : यश - शुभमची शतकी खेळी; मध्य प्रदेशचे मुंबईला चोख प्रत्युत्तर

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू : मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मध्य प्रदेशने आपल्या पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत मुंबईला चोख प्रत्युत्तर दिले. मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्यानंतर मध्य प्रदेशने आपल्या पहिल्या डावात 1 बाद 250 धावांपर्यंत मजल मारली. मध्यप्रदेशकडून सलामीवीर यश दुबेने नाबाद शतकी (106) खेळी केली. (Ranji Trophy Final Madhya Pradesh Solid Start In First Inning Against Mumbai)

मुंबईने सर्फराज खानच्या 134 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 374 धावा उभारल्या. त्यानंतर मध्य प्रदेशनेही आपल्या पहिल्या डावाची दमदार सुरूवात केली. सलामीवीर यश दुबे आणि हमांशू मंत्री यांनी 47 धावांची सलामी दिली. मात्र मंत्रीला तुषार देशपांडने 31 धावांवर बाद करत मध्ये प्रदेशला पहिला धक्का दिला. यानंतर सलामीवीर यश दुबे आणि शुभम शर्माने दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. सामन्याचा दुसरा दिवस खेळून काढल्यानंतर यश दुबेने नाबाद शतक झळकावले. यशला साथ देणाऱ्या शुभम शर्माने देखील आपले शतक पूर्ण करत मध्यप्रदेशची बाजू भक्कम केली.

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी जवळपास द्विशतकी भागीदारी रचून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. असे असले तरी मध्ये प्रदेश तिसऱ्या दिवशीचे दुसरे सत्र सुरू झाले त्यावेळी अजून पहिल्या डावात 130 धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैसवाल यांनी 87 धावांची सलामी दिली. दरम्यान, शॉ 47 धावांवर बाद झाला. त्यानंतर यशस्वीने 78 धावांची खेळी करत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला.

मात्र या दोघांव्यतिरिक्त टॉप ऑर्डरमधील इतर फलंदाजांनी फारशी चमक दाखवता आली नाही. दरम्यान, मुंबईची 4 बाद 185 धावा अशी अवस्था झाली असताना मधल्या फळीतील सर्फराज खानने पुन्हा एकदा मुंबईसाठी शतकी खेळी केली. त्याने आक्रमक फलंदाजी करत 134 धावा केल्या. या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 374 धावा उभारल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT