Ravindra Jadeja Ranji Trophy  esakal
क्रीडा

Ravindra Jadeja Ranji Trophy : रविंद्र जडेजाचे 'रिकामे' पुनरागमन; पहिल्या दिवशी एकही..

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja Ranji Trophy : भारतीय संघ जरी सध्या न्यूझीलंडविरूद्ध वनडे आणि टी 20 मालिका खेळत असला तरी सर्वांचे लक्षे फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेकडे आहे. भारतीय संघ देखील आपल्या कसोटी संघाला तयार करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दुखापतीतून सावरणाऱ्या रविंद्र जडेजाला रणजी ट्रॉफी सामन्यात खेळून त्याचा फिटनेस सिद्ध करण्यास सांगण्यात आले होते.

सौराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात आजपासून रणजी ट्रॉफीचा सातव्या फेरीतील सामना सुरू झाला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला सौराष्ट्रचा कर्णधार करण्यात आले होते. मात्र तब्बल 5 महिन्यांनी मैदानावर परतणाऱ्या रविंद्र जडेजासाठी सामन्याचा पहिला दिवस फारसा चांगला गेला नाही.

तमिळनाडून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करणाऱ्या सौराष्ट्रने तमिळनाडूला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला होता. मात्र त्यानंतर तमिळनाडूने डाव सावरला. साई सुदर्शन बाबा अपराजीत यांनी 81 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी जडेजाने तोडली. त्याने बाबा अपरातीजला 45 धावांवर बाद केले. मात्र हा रविंद्र जडेजा नव्हता तर तो धर्मेंद्रसिंह जडेजा होता.

त्यानंतर युवराजसिंह दोदियाने साई सुदर्शनला 45 धावांवर बाद करत तामिळनाडूला तिसरा धक्का दिला. या धक्क्यातून सावरत बाबा इंद्रजीत आणि प्रदोष पॉल यांनी संघाचे दीडशतक पार करून दिले. अखेर चिराग जानीने प्रदोषला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर मात्र इंद्रजीत आणि विजय शंकर यांनी तमिळनाडूची आणखी पडझड होऊ दिली नाही.

तमिळनाडूने पहिल्या दिवशी 90 षटकात 4 बाद 183 धावांपर्यंत मजल मारली. बाबा इंद्रजीत 45 धावा करून नाबाद होता तर विजय शंकर 11 धावा करून नाबाद होता. सौराष्ट्रकडून कर्णधार रविंद्र जडेजाने तब्बल 17 षटके टाकत आपला बॉलिंगचा फिटनेस सिद्ध केला. त्याने 2 षटके निर्धाव देखील टाकले. मात्र त्याला पहिल्या दिवशी एकही विकेट घेण्यात यश आले नाही. सौराष्ट्रकडून चिराग जानीने 2 धर्मेंद्रसिंह जडेजा आणि युवराजसिंह दोदिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT