ranji trophy uttarakhand cricket team Controversy food worth rs 1.74 crore spent 35 lakhs for banans
ranji trophy uttarakhand cricket team Controversy food worth rs 1.74 crore spent 35 lakhs for banans  
क्रीडा

उत्तराखंड संघाच्या जेवणावर 1.74 कोटी, तर केळींसाठी 35 लाख खर्च

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेट जगत आणि त्याभोवती होणारे वाद यांचा खूप जुना संबंध आहे. प्रत्येक मोसमात मैदानात आणि मैदानाबाहेर काही ना काही वाद होतच राहातात. रणजी ट्रॉफी 2021-22 हंगाम देखील यापासून वेगळा ठरला नाही. दुसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये मुंबई आणि उत्तराखंडचे संघ आमनेसामने आले. 41 वेळच्या चॅम्पियन मुंबईने हा सामना विक्रमी 725 धावांनी जिंकला. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 250 वर्षांच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत संघाचा हा सर्वात मोठा विजय होता. दरम्यान हा सामना गमावल्यानंतर उत्तराखंडचा क्रिकेट संघ वादात सापडला आहे. हा वाद इतका वाढला की, तेथील क्रिकेट असोसिएशनलाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तराखंडचा संघ कागदावर करोडो रुपये खर्च दाखवतो, पण खेळाडूंना फक्त 100 रुपये रोजचा भत्ता देतो. ही बातमी समोर आल्यानंतर उत्तराखंड क्रिकेटने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. असोसिएशनने खेळाडूंच्या खाण्यापिण्याच्या खर्चाचा खुलासा केला आहे, हे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार 1.74 कोटी रुपये खाण्यापिण्यावर खर्च करण्यात आले आहेत. खेळाडूंना 49 लाख 58 हजार रुपये दैनंदिन भत्ता म्हणून देण्यात आला. केळी आणि पाण्याच्या बाटल्यांसाठी करण्यात आलेल्या खर्चाचे आश्चर्यकारक आकडे समोर आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असोसिएशनने केळी खरेदी करण्यासाठी 35 लाख रुपये खर्च केले. त्याचवेळी पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी 22 लाख रुपये लागले.

केवळ खर्चाबाबत उत्तराखंड क्रिकेटमध्ये गदारोळ झालेला नाही. प्रशासकीय अनियमिततेबाबतही रिपोर्ट समोर आले आहेत. असोसिएशनने निवेदन जारी करून सर्व काही स्पष्ट केले. त्यांच्या मते, 2021-22 च्या हंगामात खेळाडूंना 1250 रुपये आणि सपोर्ट स्टाफला 1500 रुपये दैनिक भत्ता म्हणून दिले जातात. बायो-बबलमुळे खेळाडू बाहेर जेवायला गेले नाहीत. त्यांच्यासाठी हॉटेलमध्येच जेवणाची ऑर्डर देण्यात आली होती. तो खर्च खेळाडूंच्या दैनंदिन भत्त्यातून दिला जात होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT