Ranveer Singh shares his Photo as Kapil Dev from 83 the Film 
क्रीडा

#RanveerAsKapil : पुन्हा बघा कपिल देवचा नटराज शॉट

वृत्तसंस्था

धर्मशाला : भारताने पहिल्यांदा 1983 मध्ये विश्वकरंडक पटकाविला, आता याच घटनेला उजाळा देत भारतीय संघाच्या कामगिरीवर 83 The Film या नावाचा  चित्रपट बनविण्यात येत असून, रणवीर सिंग कपिल देवची भूमिका करणार आहे.

त्याने आता या चित्रपटातील सिनचा एक फोटो शेअर केला आहे. या मध्ये तो कपिल देवचा फेमस नटराज शॉट खेळताना दिसत आहे. या फोटोत तो सेम टू सेम कपिल देवसारखा दिसत आहे. चाहत्यांनीही त्याचे या भूमिकेसाठी तोंडभरुन कौतुक केले आहे.

रणवीरने या चित्रपटाच्या शूटींगला धर्मशाला स्टेडियममध्ये सुरवात केली होती. त्याने यापूर्वीही ट्विटरवर कपिल देव सोबतचे फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे. 

रणवीरने या चित्रपटासाठी फेब्रुवारीपासूनच बलविंदरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली तयरीला सुरवात केली आहे. बलविंदरसिंग 1983च्या विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघात गोलंदाज होते. रणवीर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये दिवसाआड दोन तास सराव करत होता. हा चित्रपट 1983च्या विश्वकरंडकावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर व्यतिरिक्त आर. बद्री, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, पंकज त्रिपाठी या कलाकारांचाही समावेश आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT