Asia Cup 2023 Sandeep Lamichhane 
क्रीडा

Asia Cup 2023 : संघात निवड झालेल्या खेळाडूला सोडून टीम आशिया कपसाठी रवाना! काय आहे कारण?

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Sandeep Lamichhane : प्रथमच आशिया कपमध्ये सहभागी होणारा नेपाळ क्रिकेट संघ मंगळवारी पाकिस्तानात पोहोचला आहे. पण संघात त्याचा स्टार लेगस्पिनर संदीप लामिछाने दिसत नव्हता. त्याची स्पर्धेसाठी संघात निवड झाली आहे.

खरं तर, संदीप लामिछानेवर देशात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारा खटला चालू आहे. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असून त्यासाठी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

23 वर्षीय लामिछानेवर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काठमांडूच्या एका हॉटेलमध्ये 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लामिछाने याने सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित असून या संदर्भात त्याला हजर राहावे लागणार आहे. संघ पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी नेपाळ क्रिकेट असोसिएशनचे व्यवस्थापक प्रदीप मजगयान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्याच्यावर न्यायालयीन केस आहे, त्यामुळे तो आमच्यासोबत जात नाही.

वृत्तानुसार, लामिछानेवर या प्रकरणाची सुनावणी रविवारी न्यायालयात होणार आहे. यानंतर, तो एकदिवसीय आशिया कप स्पर्धेसाठी त्याच्या संघात सामील होऊ शकेल अशी अपेक्षा आहे.

यावेळी आशिया कप स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होत आहेत. नेपाळ प्रथमच या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 30 ऑगस्ट रोजी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात प्रथमच पाकिस्तानविरुद्ध खेळेल. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरपर्यंत चालणारी ही स्पर्धा यावेळी पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवली जाणार आहे.

आशिया कप 2023 साठी नेपाळ संघ

कुशल भुरटेल, भीम सरकी, संदीप जोरा, रोहित पौडेल, दीपेंद्र सिंग आयरे, ललित राजबंशी, कुशल मल्ला, आरिफ शेख, प्रतिस जीसी, अर्जुन सौद, आसिफ शेख, करण केसी, गुलसन झा, सोमपाल कामी, संदीप लामिछाने.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT