Ravi Bishnoi ICC T20 Ranking  esakal
क्रीडा

Ravi Bishnoi ICC T20 Ranking : टी 20 रँकिंगमध्ये मोठा धमाका; रवी बिश्नोईने राशिद खानचे सिंहासन हिसकावले

अनिरुद्ध संकपाळ

Ravi Bishnoi ICC T20 Ranking : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 मालिकेत भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईने दमदार गोलंदाजी केली होती. त्याने गेल्या 5 टी 20 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. फळ त्याला मिळाले असून त्याने आयसीसी टी 20 बॉलिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्धची 5 टी 20 सामन्यांची मालिका 4 - 1 अशी जिंकली आहे.

भारताने वनडे वर्ल्डकपमच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाची बदला टी 20 मालिकेत घेतली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका 4 - 1 अशी जिंकली.

भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईने 5 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे आयसीसी रँकिंगमध्ये त्याला मोठा फायदा झाला. त्याने वानिंदू हसरंगा आणि राशिद खान यांना मागं टाकत टी 20 बॉलिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं.

रवी बिश्वोईची दक्षिण अफ्रिका दौऱ्यावरील टी 20 मालिकेसाठी देखील संघात निवड झाली आहे. तो सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता त्याला या दौऱ्यावर देखील प्लेईंग 11 मध्ये संधी मिळेल.

तो वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठीच्या रेसमध्ये देखील आघाडीवर आहे. त्याला आयपीएल 2024 मध्ये देखील आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT