R. Ashwin Hairstyle esakal
क्रीडा

R. Ashwin Hairstyle : इंग्लंडला महिन्याभरातच कळून जाईल... अश्विनच्या नव्या हेअर स्टाईलवर शास्त्रींची फिरकी

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin Hairstyle : भारताचे माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मंगळवारी बीसीसीआयकडून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तब्बल तीन वर्षानंतर बीसीसीआयने हैदराबादमध्ये वार्षिक पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं.

यावेळी बोलताना रवी शास्त्रींनी भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची त्याच्या नव्या हेअर स्टाईलवरून फिरकी घेतली. चेष्टा मस्करी करत शास्त्रींनी पाहुण्या इंग्लंड संघाला देखील इशारा देऊन टाकला.

रवी शास्त्री म्हणाले की, 'अश्विनने आताच सांगितलं की तो चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. त्याने जी नवी हेअर स्टाईल केली आहे. ती पाहता त्याचं माईंड फ्री झालं असेल. त्याच्या डोक्याला हवा लागली आहे तर तुम्ही कल्पना करू शकता की तो काय विचार करत असेल. तिसरा असू शकतो किंवा चौथा देखील असू शकतो. इंग्लंडला येत्या महिन्याभरात ते समजेलच.'

बीसीसीआयचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यानंतर शास्त्रींनी बीसीसीआयची स्तुती केली. ते म्हणाले की, 'मला हा पुरस्कार दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार. या खेळात मला चार दशकं होऊन गेली. मी भारतीय क्रिकेटशी जोडला जाण्याची एकही संधी सोडली नाही. माझ्यासाठी हा क्षण खूप मर्मस्पर्शी आहे.'

'मी वयाच्या 17 व्या वर्षी आपली क्रिकेट कारकीर्द सुरू केली होती आणि वयाच्या 31 व्या वर्षी मी खेळाडू म्हणून माझी कारकीर्द संपवली. वयाच्या तिशीत बीसीसीआय माझे प्रोटेक्टर होते. त्यांनीच मला माझ्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी रस्ता दाखवला होता.'

बीसीसीआयने यावेळी 2019 - 20 च्या हंगामातील सर्वोकृष्ट पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंना सन्मानित केलं. याचबरोबर रवी शास्त्रींसोबतच माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांना देखील जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. रवी शास्त्री हे 1983 च्या वर्ल्डकप विनिंग संघाचे सदस्य होते. त्यांनी 1985 मध्ये वर्ल्ड सिरीजमध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता.

61 वर्षाच्या रवी शास्त्रींनी 80 कसोटी, 150 वनडे सामने खेळले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी अनेक वर्षे समालोचक म्हणून आपलं नाव कमावलं. त्यानंतर ते दोनवेळा भारतीय संघाचे प्रशिक्षक देखील राहिले होते. त्यांनी 2014 ते 2016 दरम्यान संघाचे संचालक म्हणून काम पाहिलं. त्यानंतर विराट कोहली कर्णधार असताना 2017 ते 2021 पर्यंत मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहिलं होत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी मालिका जिंकल्या. संघ कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाही मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचला होता. 2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये देखील भारतीय संघा सेमी फायनलपर्यंत पोहचला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT