ravi shastri 
क्रीडा

Ravi Shastri : टीम इंडियाचे प्रशिक्षक पुन्हा शास्त्री होणार? म्हणाले- 'सात वर्षे जे...'

शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली परंतु यादरम्यान एकही ICC ट्रॉफी जिंकली नाही

Kiran Mahanavar

Ravi Shastri on Coaching : रवी शास्त्रीच्या प्रशिक्षणात टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली होती. परदेशात भारतीय संघाने त्यांच्या प्रशिक्षणाखाली कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या T20 विश्वचषकानंतर त्याचा कार्यकाळ संपला. त्याच्या जागी राहुल द्रविडकडे कमान सोपवण्यात आली आहे. दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, मला दुसऱ्यांदा कोचिंग करायचे नाही. कोच म्हणून जे काही करायचे होते ते मी सात वर्षांत करून दाखविले आहे. आता प्रेक्षक म्हणून खेळाचा आनंद घ्यायचा आहे.

शास्त्री यांनी सात वर्षे भारताचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. याआधी कोणीही इतक्या वर्ष करू शकले नव्हते. प्रशिक्षक म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलियात दोनदा कसोटी मालिका जिंकली. त्याच्या आधी कोणत्याही भारतीय प्रशिक्षकाने ऑस्ट्रेलियात एकदाही मालिका जिंकलेली नव्हती. याशिवाय त्यांनी तयार केलेली वेगवान गोलंदाजांची फौज आजही सर्वांना घाबरते. त्याच गोलंदाजांच्या जोरावर टीम इंडिया आजही परदेशात कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरते. मात्र रवी शास्त्रीला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही.

रवी शास्त्रींना जेव्हा विचारण्यात आले की, तुम्हाला पुन्हा भारताचे कोच होणार का? तेव्हा शास्त्री म्हणाले, माझा कोचिंग काळ संपला आहे. सात वर्षे जे आवश्यक होते, ते मी केले. आता मी दुरूनच खेळ पाहीन आणि त्याचा आनंद घेईन. या वर्षाच्या सुरुवातीला, शास्त्री आयपीएल 2022 दरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये परतले. सध्या लेजेंड्स लीग क्रिकेट 2022 चे कॉमेंट्री करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT